Sleeping At Work Is Not Crime Saam Tv
देश विदेश

Sleeping In Office: कामावर डुलकी, फिकर नॉट! कामाच्या ठिकाणी झोपणं गुन्हा नाही: हायकोर्ट

Sleeping At Work Is Not Crime: आता कामाच्या ठिकाणी तुम्हाला डुलकी घेण्यासाठी कायद्यानं मान्यता मिळालीये. कशी आणि का पाहुयात या स्पेशल रिपोर्टमध्ये.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

तेजल नागरे, साम प्रतिनिधी

कार्यालयात कामाच्या वेळेत अनेकांना डुलकी लागते. दरम्यान अशी ऑन ड्युटी डुलकी दिल्याने अनेकांवर कारवाईही होतेय. पण आता कामाच्या ठिकाणी बिनधास्त झोपा. कारण आता कामावर असताना झोपणे हा काही गुन्हा ठरणार नाही .संविधानानुसार सर्व लोकांना झोपण्याचा, आराम करण्याचा अधिकार असल्याचं खुद्द आता न्यायालयानंचं नमुद केलंय.

कर्मचाऱ्यांवर कामाचा मोठा ताण असल्यानं झोपण्याच्या अधिकाराचे महत्त्व आणि शिफ्टमध्ये काम करत असलेल्यांच्या जीवन संतुलनाबाबत न्यायालयानचं आता दखल घेतली आहे. याला कारण ठरलंय कर्नाटकातील एक केस. कर्नाटकात एक कॉन्स्टेबल ऑन ड्यूटी झोपल्याने त्याला निलंबित करण्यात आलं होतं.याच प्रकरणाची सुनावणी करताना न्यायालयाने झोपेच्या महत्त्वासह कामाचा अतिरिक्त ताण आणि कामाच्या वेळा यासंदर्भातही निर्देश दिले आहेत.

त्यामुळे आता कामाच्या ठिकाणी तुम्हाला डुलकी घेण्यासाठी कायद्यानं मान्यता मिळालेली असली तरी ऑफीसमधल्या तुमच्या कामावर याचा परिणाम होणार नाही याची काळजी तुम्हालाच घ्यावी लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sushil Kedia: 'मला माफ करा, राज ठाकरेंचा आदर करतो'; मनसेच्या दणक्यानंतर उद्योजक संजय केडिया वठणीवर

National Highway Toll : प्रवाशांनो लक्ष द्या! राष्ट्रीय महामार्गांवरील टोल दर ५० टक्क्यांनी कमी; जाणून घ्या सरकारची अधिसूचना

Worli Dome : मोर्चाच्या चर्चेने सरकारला माघार घ्यावी लागली: Raj Thackeray | VIDEO

अनाजीपंत, अंतरपाट ते बाळासाहेब...; ठाकरे बंधू फडणवीसांवर तुटून पडले

Laptop Full Form: ९९% लोकांना माहित नसेल लॅपटॉपचे फुल फॉर्म काय?

SCROLL FOR NEXT