Liquor Home Delivery Saam Tv
देश विदेश

Liquor Home Delivery: दारू मिळणार घरपोच? स्विगी, झोमॅटो करणार डिलिव्हरी; ६ राज्यांमध्ये सरकारचा प्लान!

Special Report: मद्यप्रेमींना घरपोच दारु मिळणार आहे. त्यासाठी 6 राज्यांमध्ये झोमॅटो, स्विगी, बिग बास्केटच्या माध्यमातून प्रायोगिक तत्वावर घरपोच दारुचा निर्णय घेण्यात येणार आहे. ही सहा राज्ये कोणती आहेत? याबरोबरच सरकार हा निर्णय का घेणार आहे?

साम टिव्ही ब्युरो

भरत मोहळकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. कारण मद्यप्रेमींना आता बारवर जाण्याची गरज नाही. कारण लवकरच झोमॅटो, स्विगी आणि बिग बास्केटवरून तुम्हाला ऑनलाईन घरपोच दारु डिलिव्हरी करण्याची सोय केली जाणार आहे. यावर 6 राज्यांनी काम सुरु केलंय. त्यामुळे दारु उद्योगासाठी हा निर्णय गेमचेंजर ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येतीय..

दारु उद्योगाला चालना देण्यासाठी राजधानी दिल्लीत प्रायोगिक तत्वावर दारुची होम डिलिव्हरी करण्याची तयारी सुरु करण्यात आलीय. यात फक्त दिल्लीच नाही तर देशातील सहा राज्यांमध्ये हा निर्णय प्रायोगिक तत्वावर राबवण्यात येणार आहे.

कोणत्या राज्यात मिळणार घरपोच दारू?

  • तामिळनाडू

  • कर्नाटक

  • पंजाब

  • हरियाणा

  • गोवा

  • केरळ

देशात प्रति व्यक्ती 5.61 लीटर दारुची विक्री होते. त्यामुळे पेट्रोल, डिझेलसह अन्न, रेशन, औषधं, कपडे घरपोच मिळत असल्याने आता दारुचीही होम डिलिव्हरी करण्याचा विचार सुरु आहे. त्याची सुरुवात लवकरच राजधानी दिल्लीतून होणार आहे. कारण मद्यविक्रीतून मिळणारा महसूल राज्य सरकारांच्या उत्पन्नाचा महत्वाचा मार्ग आहे.

कोरोनात मद्यप्रेमींकडून घरपोच दारुची मागणी करण्यात आली होती. तर कर्नाटक आणि केरळने घरपोच दारुची संकल्पना मांडली होती. मात्र ती अंमलात आली नाही. महाराष्ट्राला 2023-24 या आर्थिक वर्षात मद्यविक्रीतून तब्बल 23 हजार 250 कोटी रुपयांचा महसूल मिळालाय.त्यामुळे 6 राज्यांमध्ये घरपोच दारुचं धोरण यशस्वी ठरलं तर महाराष्ट्रातही याचा विचार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे आंदोलन

Drishyam 3 Cast Fee: 'दृश्यम 3'च्या स्टारकास्टची फी किती? अजय देवगणला तब्बूपेक्षा 528% अधिक मानधन

Pumpkin seeds: कोलेस्ट्रॉल मेणासारखं वितळेल आणि हार्ट अटॅकचा धोकाही होईल कमी, रोज सकाळी खा मूठभर 'या' बिया

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव स्कूल बसची दुचाकीला धडक, विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

Political News : राजकीय वर्तुळात मोठी घडामोड! काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा, 'या' नेत्याकडे दिली जबाबदारी

SCROLL FOR NEXT