PM Modi's Lok Sabha Speech Saamtv
देश विदेश

PM Modi Speech: 'गरीबाचा मुलगा पंतप्रधान, ही भारतीय लोकशाहीची ताकद...' जुन्या संसद भवनाला निरोप देताना PM मोदी भावुक

Gangappa Pujari

PM Narendra Modi's Speech in Sansad:

मोदी सरकारने बोलावलेल्या संसदेच्या विशेष अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. हे अधिवेशन पाच दिवस चालणार असून या अधिवेशनात एकूण 8 विधेयके मांडण्यात येणार आहेत. संसदेच्या नवीन इमारतीमध्ये हे सत्र भरवण्यात येत उद्यापासून नव्या संसदेत काम सुरू होणार आहे. आजचे कामकाज जुन्याच संसदेत पार पडले. यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी यांनी संसदेतील अनेक आठवणींना उजाळा दिला.

काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

"आपण ऐतिहासिक संसद भवनातून निरोप घेत आहे. आज जुन्या भवनात शेवटचा दिवस आहे. असे म्हणत आजचा दिवस भावनिक क्षण असल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितले. जुने घर सोडून नवीन घरात जातो तेव्हा जुन्या आठवणी जाग्या होतात, तशीच आजची भावना असल्याचे सांगत या 75 वर्षांत स्वतंत्र भारताच्या पुनर्रचनेशी संबंधित अनेक घटना या सभागृहातून पार पडल्या. " असे मोदी यावेळी म्हणाले.

ही लोकशाहीची ताकद...

"संसदेत पहिल्यांदा पाऊल ठेवलेला क्षण माझ्यासाठी सर्वात भावनिक होता. रेल्वे प्लॅटफॉर्मवर उदरनिर्वाह करणारा माणूस संसदेत पोहोचेल. एक दिवस संपूर्ण देश माझ्यावर इतकं प्रेम करेल असं मला कधीच वाटलं नव्हतं," असे म्हणत ही भारताच्या लोकशाहीची ताकद असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.

पंडीत नेहरुंचाही उल्लेख...

आपण नव्या भवनात भलेही जाऊ पण जुनं संसद भवन देखील येणाऱ्या पिढ्यांना कायम प्रेरणा देत राहिलं. हा भारताच्या लोकशाहीच्या स्वर्णिम प्रवासाचा भाग आहे. पंतप्रधान नेहरु (Jawaharlal Nehru) मनमोहनसिंग (Manmohan Singh) यांचेही या संसदेत मोठे योगदान आहे, असे ते यावेळी म्हणाले. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: मस्तच भावा! 'फुलवंती' गाण्यावर तरुणाचा गुलीगत डान्स; बेधुंद होऊन नाचला, VIDEO ला हजारोंची पसंती

Maharashtra Assembly Election : भाजपचे १०५ उमेदवार ठरले, आज पहिली यादी येण्याची शक्यता, काही विद्यमान आमदारांना डच्चू मिळणार!

Governemnt Job: अन्न आणि औषध प्रशासनात नोकरीची सुवर्णसंधी; महिना १,१२,००० रुपये पगार; जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंचा डबल धमाका, महायुतीला 'दे धक्का',भाजप- राष्ट्रवादीचे २ बडे नेते शिवबंधन बांधणार; आज मातोश्रीवर पक्षप्रवेश

Viral Video: ना रोमान्स, ना कपल डान्स; दिल्ली मेट्रोत आता कुटाकुटी, viral video

SCROLL FOR NEXT