Spanish Woman physical assaulted in Jharkhand Crime News SAAM TV
देश विदेश

Crime News : संतापजनक! भारतात फिरायला आलेल्या विदेशी महिलेवर सामूहिक बलात्कार

Jharkhand Crime News : परदेशातून भारतातील झारखंडमध्ये फिरायला आलेल्या महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे.

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

Spanish Woman physical assaulted in Jharkhand :

परदेशातून भारतात फिरायला आलेल्या महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. पीडित महिला आपल्या पतीसोबत झारखंड येथील दुमका येथे आली होती. तेथे आठ ते दहा जणांनी तिच्यावर अत्याचार केला. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे. पीडितेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, हंसडीहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुरुमाहाट येथे ही धक्कादायक घटना घडली. स्पेनमधील महिला या ठिकाणी फिरायला आली होती. शुक्रवारी रात्री उशिरा ही घटना घडली. महिलेसोबत तिचा पतीही होता.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

स्पेनमधून पती-पत्नी टुरिस्ट व्हिसावर भारतात (India) आले होते. ते आधी स्पेनमधून पाकिस्तानला गेले होते. तिथून ते बांगलादेश आणि त्यानंतर तिथून भारतातील झारखंडच्या दुमका येथे आले होते. दुमकाच्या हंसडीहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुंजी गावात ते टेंटमध्ये थांबले होते. झारखंडमधून (Jharkhand) ते दोघे नेपाळला जाणार होते. त्याआधीच आठ ते दहा जण तिथे आले. त्यांनी महिलेवर अत्याचार केले.

या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि माहिती घेतली. पीडितेच्या तक्रारीवर घटनेचा तपास सुरू केला. पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांची चौकशी सुरू आहे. पीडितेला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Actor : मनोरंजनसृष्टी हादरली! प्रसिद्ध मराठी अभिनेत्यावर जीवघेणा हल्ला; ३० जणांच्या टोळक्याने घेरले अन्...

Maharashtra News Live Update: सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीत महायुतीमध्ये बिघाडीची शक्यता?

Heart Attack Recovery: हार्ट सर्जरीनंतर हृदय पुन्हा मजबूत कसं करायचं? तज्ज्ञांनी सांगितला व्यायामाचा योग्य नियम; नक्की वाचा

Shocking : धक्कादायक! पत्नीचे ३ वर्षांपासून अफेअर, पतीला कळताच बॉयफ्रेंडचा काढला काटा

Godrej Professional Vibe Collection: मुंबईत लॉन्च झालं नवीन हेअर कलर कलेक्शन; 1000 हून अधिक हेअर स्टायलिस्ट्सना मिळणार नोकरी

SCROLL FOR NEXT