Monsoon 2022 Updates : Southwest monsoon debuts over Andaman & Nicobar islands Saam Tv News
देश विदेश

Good News : पाऊस येणार, उकाडा कमी होणार! अंदमानात मान्सून दाखल...

Monsoon 2022 Updates : १ जूनपर्यंत केरळमध्ये पावसाला सुरुवात होणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवी दिल्ली: सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे. अंदमान बेटात मान्सून दाखल झाला आहे. त्यामुळे येत्या १ जूनपर्यंत हा मान्सून (Monsoon) केरळमध्ये (Kerala) दाखल होणार आहे. यंदाच्या वर्षी एक आठवडा अगोदरच पावसाला (Rain) सुरुवात होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने (IMD) वर्तवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह पुर्ण देशात उत्साहाचं वातावरण आहे. १ जूनपर्यंत केरळमध्ये आणि केरळच्या आसपासच्या काही भागात पावसाला सुरुवात होणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. (Monsoon 2022 Updates : Southwest monsoon debuts over Andaman & Nicobar islands)

हे देखील पाहा -

भारतीय हवामान (Weather) विभागाचे अधिकारी के. एस. होसाळीकर (K. S. Hosalikar, Head-IMD Pune, India Meteorological Department) यांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या १ जूनला पावसाची (Rain) शक्यता वर्तवली आहे. तसेच राज्यातही पुढील 5 दिवस द. कोकण, द. मध्य महाराष्ट्र आणि द. मराठवाड्याच्या काही भागांमध्ये गडगडाटासह पावसाचा इशारा दिला आहे. विदर्भातील काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशाराही देण्यात आला आहे. सध्या देशाच्या अनेक भागात उष्णतेच्या लाटेमुळे नागरिकांना त्रास होत आहे. अशात येणाऱ्या मान्सूनमुळे तापमानातही घट होईल.

त्याचप्रमाणे नैऋत्य मान्सून द.बंगालच्या उपसागराच्या काही भागात,अंदमान निकोबार बेटांचा बहुतांश भाग आणि अंदमान समुद्रात आज 16 मे ला पुढे सरकला आहे. त्यामुळे पुढील 4-5 दिवसांत केरळ किनारपट्टी आणि द. आतील कर्नाटक, आसाम, मेघालय तसेच अरुणाचल प्रदेशात मुसळधार ते अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. एकीकडे राजधानी दिल्लीत तापमान हे ४९ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे तर विदर्भातही प्रचंड उकाडा आहे. अशात मान्सूनच्या आगमनाने तापमानात घट होऊन दिलासा मिळणार आहे.

'या' जिल्ह्यांना पावसाचा इशारा

यंदा मान्सून लवकर दाखल झाला आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, परभणी, नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: वडाळ्यातून सलग नवव्यांदा कालिदास कोलंबकर विजयी

Wayanad By Election Result 2024: भावाचा गड राखणार; प्रियंका गांधी २ लाख ३५ हजार मतांनी आघाडीवर

Abhishek Gaonkar : 'सारं काही तिच्यासाठी' फेम अभिनेता चढणार बोहल्यावर; नवरीचा थाटात पार पडला मेहंदी सोहळा, पाहा PHOTO

Maharashtra Election Result: भाजपला १२०+ जागा मिळणार! निकालाआधीच भाजपच्या नेत्याचा दावा

Amla Pickle: आवळ्याचे लोणचे आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे, जाणून घ्या कारणे...

SCROLL FOR NEXT