Sonia Gandhi hospitalised SAAM TV
देश विदेश

Sonia Gandhi hospitalised : सोनिया गांधींची प्रकृती बिघडली, दिल्लीच्या रुग्णालयात दाखल, डॉक्टरांनी सांगितलं नेमकं कारण

Sonia Gandhi News : काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची प्रकृती बिघडली असून, त्यांना दिल्लीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Nandkumar Joshi

Sonia Gandhi Admitted : काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांची प्रकृती बिघडल्याचे वृत्त आहे. सोनिया यांना दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. ताप आल्यानंतर गुरुवारी त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. (Latest Marathi News)

सर गंगाराम रुग्णालयाने प्रसिद्ध केलेल्या हेल्थ बुलेटिननुसार, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्यावर डॉ. अरूप बासू यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. त्यांना २ मार्चला म्हणजेच गुरुवारी ताप आल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. अनेक वैद्यकीय चाचण्या करण्यात येत आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे.

यापूर्वीही जानेवारीत सोनिया गांधी यांची तब्येत बिघडली होती. प्रकृती अस्वास्थ्यामुळे ५ जानेवारी रोजी त्यांना सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांना व्हायरल संसर्ग झाल्याने रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. त्यावेळी सोनिया यांच्या कन्या आणि काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी या त्यांच्यासोबत होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे शहर काँग्रेसच्या वतीने आज थेट राजभवनावर आंदोलन

Rain Update : पुण्याला रेड अलर्ट, मुंबईसह १० जिल्ह्याना अतिमुसळधार पावसाचा इशारा; तुमच्या जिल्ह्याचा यात समावेश आहे का?

Maharashtra Politics: काँग्रेसला मोठा धक्का; बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा, राजकीय वर्तुळात खळबळ

Wednesday Horoscope : पैशाच्या समस्या सुटतील, 5 राशींच्या व्यक्तींना भावनांवर नियंत्रण ठेवण्याची गरज; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Manoj Jarange Patil: ...तर सरकारचा माज उतरवलाच पाहिजे; मनोज जरांगे पाटील कडाडले

SCROLL FOR NEXT