Crime News Latest News SAAM TV
देश विदेश

Crime News : मित्रासोबत फिरायला गेलेल्या इंजिनीअर तरुणीवर १० जणांनी केला सामूहिक बलात्कार

पीडित तरुणी मित्रासोबत फिरायला गेली होती. तिथे दहा जणांनी तिचं अपहरण केल्यानंतर सामूहिक बलात्कार केला.

Nandkumar Joshi

Jharkhand Crime News Update: झारखंडमध्ये महिलांवरील अत्याचाराच्या घटना सुरूच आहेत. चाइबासा विमानतळाजवळ आपल्या मित्रासोबत फिरायला गेलेल्या इंजिनीअर तरुणीचं दहा जणांनी अपहरण केलं. तिच्या सुटकेसाठी प्रयत्न करणाऱ्या मित्राला आरोपींनी मारहाण केली. त्यानंतर तरुणीला निर्जनस्थळी घेऊन गेले. तिथे तिच्यावर दहा जणांनी सामूहिक बलात्कार केला.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पीडितेला उपचारांसाठी रुग्णालयात नेले. पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी छापेमारी सुरू केली आहे. (Latest Marathi News)

पीडिता ही सॉफ्टवेअर इंजिनीअर आहे. पोलिसांच्या (Police) माहितीनुसार, या घटनेनंतर आरोपींनी पीडितेला जीवे मारण्याची धमकी दिली. पसार होताना आरोपींनी तिच्याकडील मोबाइल आणि पैसे हिसकावले.

रुग्णालयात दाखल असलेल्या पीडितेने पोलिसांकडे जबाब नोंदवला आहे. त्या आधारे पोलिसांनी दहा आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. आरोपींविरोधात सामूहिक बलात्कार, मारहाण आणि लूटमार आदी कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी अनेक पथके तयार केली आहेत. ही पथके ठिकठिकाणी छापेमारी करत आहेत. (Crime News)

मित्रासोबत फिरायला गेली होती तरूणी

झारखंडच्या पश्चिमेकडील सिंहभूम येथील चाइबासा येथील पीडित तरुणीने पोलिसांना सर्व हकिकत सांगितली. ती सॉफ्टवेअर इंजिनीअर आहे. शुक्रवारी ती आपल्या मित्रासोबत दुचाकीवरून चाइबासा विमानतळ परिसरात फिरायला गेली होती.

तिथे दोघे जण बसून गप्पा मारत होते. त्यावेळी तिथे काही तरूण आले. त्यांनी गैरवर्तन करण्यास सुरुवात केली. मित्राने तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. आरोपींनी त्याला बेदम मारहाण केली. त्यानंतर तरुणीचे अपहरण केले. त्यानंतर तिला निर्जनस्थळी घेऊन गेले. त्यानंतर तिथे तिच्यावर सामूहिक अत्याचार केला.

बेशुद्ध पडल्यानंतरही अत्याचार सुरूच

पीडिताने पोलिसांकडे जबाब नोंदवला. पीडितेने प्रतिकार केला. मात्र, ती काही वेळाने बेशुद्ध झाली. त्यानंतरही आरोपींनी तिच्यावर अत्याचार सुरूच ठेवले. पोलिसांनी सांगितले की, वैद्यकीय तपासणी केल्यानंतर चाइबासा येथील मुफस्सिल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.

आरोपींनी तरुणीचं अपहरण केल्यानंतर तिच्या मित्राने तात्काळ पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. त्यानंतर आरोपींच्या तावडीतून पोलिसांनी तरुणीची सुटका केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT