Flying snakes Saam TV
देश विदेश

Viral Snake video: अविश्वसनीय ! साप चक्क हवेत उडतोय; VIDEO होतोय व्हायरल

हवेत उडणारा सापा; VIDEO होतोय व्हायरल

Ruchika Jadhav

Flying snakes : सापाचे आजवर तुम्ही अनेक व्हिडिओ पाहिले असतील. अनेक सर्प मित्र त्यांना जीवनदान देत त्यांचं रक्षण करतात. मानवी अधिवासात एखादा साप आढळल्यास त्याला नैसर्गिक अधिवासात सोडले जाते. साप आणि रेस्क्यू करणारी व्यक्ती यांचे अनेक खतरनाक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अशात आता एक अविश्वसनीय व्हिडीओ समोर आलाय. (Snake video)

या व्हिडिओमध्ये एक साप चक्क पक्षांप्रमाणे हवेत उडताना दिसत आहे. कार्टून किंवा काल्पनिक नाही तर तो प्रत्यक्षात हवेत झेप घेत आहे. साप हवेत उडू शकत नाही हे खरं आहे. कारण तो सरपटणारा प्राणी आहे.

मात्र त्याने एक उंच ठिकाणाहून हवेत जोरदार उडी घेतली आहे. नेमके त्याच वेळेस एका व्यक्तीने त्याच्या फोनमध्ये ही दृश्य चित्रित केली आहेत. त्यामुळे यात साप हवेत उडतोय की काय असे भासत आहे.

हवेत फक्त पक्षी उडू शकतात. त्यामुळे साप जेव्हा अशी करामत करतो तेव्हा पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे तो धाडकन काही आपटतो. व्हिडिओमध्ये साप खाली पडल्यावर त्याचा आवाज देखील ऐकू येत आहे. हा व्हिडिओ ऑस्ट्रेलियामधील असल्याचे म्हटले जात आहे.

IAS सुप्रिया साहू यांनी हा व्हिडिओ त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केलाय. आतापर्यंत या व्हिडिओला 10 लाखांहून अधिक व्ह्युव्ज मिळाले आहेत. एका व्यक्तीने यावर कमेंटमध्ये म्हटलं आहे की, सापांची ही एक वेगळी प्रजाती आहे. हे साप त्यांच्या विशेष गतीसाठी ओळखले जातात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amla Benefits : सकाळी रिकाम्या पोटी आवळा खाल्ला तर काय होते? 'हे' ५ फायदे तुम्हाला थक्क करतील

Inspiring Story: 55 वर्षीय मिठारी गुरूजींची प्रेरणादायी कहाणी; एका विद्यार्थिनीसाठी जंगलातून 5 किमी पायपीट

Thane Firing: मोठी बातमी! ठाण्यात ठाकरे गटाच्या नेत्यावर गोळीबार, उपचारादरम्यान पूर्णेकर यांचा मृत्यू

पुणे महापालिका नोकरभरती घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जेजुरी देवस्थानच्या माजी विश्वस्ताला अटक

'राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव'; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान

SCROLL FOR NEXT