देश विदेश

Shocking: धक्कादायक! बहिणी मावशीच्या घरी निघाल्या, नराधमांनी दोघींवर जंगलात केला सामूहिक बलात्कार, भयानक कृत्यानंतर मोबाईल घेऊन पसार

Singrauli Crime News: सिंगरौलीतील ओडगढी जंगलात दुचाकीस्वार तिघांनी दोन अल्पवयीन बहिणींवर सामूहिक बलात्कार केला. आरोपी मोबाईल घेऊन पळून गेले, मात्र पोलिसांनी त्यांना अटक करून पोक्सो कायद्याखाली गुन्हा नोंदवला असून संतापाची लाट उसळली आहे.

Dhanshri Shintre

  • सिंगरौलीतील ओडगढी जंगल परिसरात दोन अल्पवयीन बहिणींवर सामूहिक बलात्कार.

  • आरोपींनी मोबाईल हिसकावून घटनास्थळावरून पळ काढला.

  • पोलिसांनी तातडीने कारवाई करून तिन्ही आरोपींना अटक केली.

  • परिसरात संतापाची लाट उसळली असून महिला सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.

सिंगरौली जिल्ह्यातील बरगवां पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेली एक भयावह घटना घडली. या घटनेने संपूर्ण परिसर हादरले आहे. ओडगढी जंगल परिसरात तीन अज्ञात दुचाकीस्वारांनी दोन अल्पवयीन बहिणींवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे मध्य प्रदेशात संतापाची लाट उसळली आहे.

माहितीनुसार, या दोन्ही बहिणी त्यांच्या दोन नातेवाईकांसोबत मावशीच्या घरी जात होत्या. दुचाकीवरून प्रवास करत असताना आरोपींनी त्यांचा पाठलाग केला. जंगलाजवळ पोहोचताच त्यांनी मुलींवर हल्ला केला. त्यांना मारहाण केली आणि एकामागोमाग एक बलात्कार केला. इतकेच नव्हे तर नराधामांनी त्यांचे मोबाईल फोनही पळवून नेले आणि तिथून पसार झाले.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने कारवाई करत आपत्कालीन सेवा ११२ च्या मदतीने मुलींना जंगलातून बाहेर काढले. दोघीही बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्या आणि त्यांना तातडीने बैढन येथील ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

बरगवां पोलिसांनी तातडीने तपास सुरू करत सायबर सेलच्या मदतीने तिन्ही संशयितांना अटक केली आहे. आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली आणि पोक्सो(POCSO) कायद्यांतर्गत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून प्रत्येक पैलूंचा बारकाईने अभ्यास केला जात आहे.

या घटनेनंतर परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली असून नागरिकांनी महिला आणि अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. मध्य प्रदेशात वाढत्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर घडलेली ही घटना समाजातील असुरक्षिततेचे भयावह चित्र अधोरेखित करते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra SIR Update : महाराष्ट्रातील २ कोटी मतदार वगळणार?

Mumbai : मुंबईत धावत्या लोकलवर दगडफेक; तरुणाचा व्हिडिओ व्हायरल, कठोर कारवाईची मागणी

Shiv Sena Hearing LIVE Updates : शिवसेना कुणाची? आजची सुनावणी संपली, कोर्टात काय काय झालं?

Maharashtra News Live Update: मांडवा फॉरेस्ट उपकेंद्रातील समुदाय आरोग्य अधिकाऱ्याची आत्महत्या

मुंबई लोकलमध्ये महिलांच्या दोन गटांत तुफान हाणामारी, Video व्हायरल

SCROLL FOR NEXT