Shraddha Walker Case aftab poonawalla  SAAM TV
देश विदेश

प्रेम अन् त्याचा भयंकर शेवट...आफताबचा खोटेपणा उघड होणार का? नार्को चाचणीत २ तासांत काय काय विचारलं?

श्रद्धा वालकर प्रकरणातील आरोपी आफताबची आज नार्को टेस्ट करण्यात आली.

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

Shraddha Walker Case Aftab Narco Test : श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातील संशयित आरोपी आफताब पूनावाला याची आज नार्को चाचणी करण्यात आली. ही चाचणी सुमारे दोन तास चालली. हत्या आणि कट आणि नंतर पुरावे नष्ट करण्याबाबत प्रश्न आफताबला विचारण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, नार्को टेस्टमुळं आफताबनं आतापर्यंत चौकशीत केलेली दिशाभूल, त्याचा खोटारडेपणा उघड होईल का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. दरम्यान आफताबनं त्याला विचारलेल्या बहुतांश प्रश्नांची उत्तरे दिली आहेत,अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय.

दिल्लीच्या डॉ. आंबेडकर रुग्णालयात गुरुवारी श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातील आरोपी आफताब पूनावाला यांची नार्को चाचणी करण्यात आली. यावेळी या प्रकरणाच्या तपासाशी संबंधित अधिकारी, विशेषज्ज्ञांचे पथकही उपस्थित होते. आफताबची नार्को चाचणी जवळपास दोन तास केली. चाचणीदरम्यान त्यानं अनेक प्रश्नांची उत्तरं दिली. सूत्रांच्या माहितीनुसार, आफताबनं अनेक प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. (Latest Marathi News)

आफताबने अनेक प्रश्नांची उत्तरे इंग्रजीत दिली आहेत. काही प्रश्नांची उत्तरे देण्यास आफताबला थोडा वेळ लागला. चाचणीवेळी त्याला अनेक प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावेळी आफताब काही वेळ शांत राहिला. ज्यावेळी हे प्रश्न पुन्हा पुन्हा विचारण्यात आले त्यावेळी आफताबनं त्या प्रश्नांची उत्तरे दिली, असे सांगितले जात आहे. (Shraddha Walker Case)

नार्को चाचणीदरम्यान आफताबला अनेक प्रश्न विचारण्यात आले. त्यात श्रद्धा वालकरची हत्या कोणत्या तारखेला करण्यात आली? श्रद्धाला का मारलं? तिची हत्या कशी करण्यात आली? तसेच श्रद्धाच्या हत्येनंतर तिच्या शरीराचे तुकडे कसे आणि कोणत्या शस्त्राने करण्यात आले? ते कुठे-कुठे फेकले? आदी प्रश्न त्याला विचारण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. याशिवाय आफताबला आणखी काही प्रश्न विचारण्यात आले. यातील बहुतेक प्रश्नांची उत्तरे त्याने दिली आहेत. (Crime News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident : बायपासवर भीषण अपघात! ३ वाहनांची जोरदार धडक, ४ जणांचा होरपळून मृत्यू

१६ महिन्यांत ३६ जणांना मृत्युदंड, 'त्या' न्यायाधीशांची तडकाफडकी कौटुंबिक न्यायालयात बदली

Maharashtra News Live Update: जुन्या कसारा घाटात वाहतूक कोंडी

Tikhat Sev Recipe: दिवाळीला फराळ करताना घरी बनवा कुरकुरीत आणि झणझणीत तिखट शेव, वाचा रेसिपी

Drinks for Liver Health: यकृतावर घाणेरडी चरबी जमा झालीये? हे ६ ड्रिंक्स लिव्हर डिटॉक्स करण्यास ठरतील फायदेशीर

SCROLL FOR NEXT