Shocking x
देश विदेश

ऐन दिवाळीत व्यावसायिकाच्या घरावर गोळीबार, ५ कोटींची मागितली खंडणी; परिसरात खळबळ

Shocking : रिअल इस्टेट व्यावसायिकाच्या घरावर अज्ञातांकडून गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. गोळीबाराची जबाबदारी एका कुख्यात गुंडाने स्वीकारत ५ कोटी खंडणीची मागणी केली आहे.

Yash Shirke

  • रिअल इस्टेट व्यावसायिकाच्या घरावर झाला गोळीबार.

  • अज्ञातांनी घरात चिठ्ठी फेकत केली ५ कोटींची मागणी.

  • गुंड कौशल चौधरीने स्वीकारली गोळीबाराची जबाबदारी.

Shocking Incident : एका रिअल इस्टेट व्यावसायिकाच्या घरावर गोळीबार करण्यात आला. दुचाकीवरुन आलेल्या काही अज्ञातांनी केलेल्या गोळीबारामध्ये सुदैवाने जीवितहानी झाली नाही. दुचाकीस्वारांनी बाल्कनीची काच फोडून घरात एक चिठ्ठी फिकली. या चिठ्ठीमध्ये कौशल चौधरी ग्रुप आणि ५ कोटी रुपये असे लिहिलेले होते. या प्रकरणाची व्यावसायिकाने पोलीस ठाण्यात तक्रार केली. ही घटना पंजाबच्या लुधियाना शहरात घडली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, लुधियानातील रिअल इस्टेट व्यावसायिक नंदलाल यांच्या घरावर गोळीबार करण्यात आला. गोळीबारानंतर घरात एक चिठ्ठी सापडली. या चिठ्ठीमध्य ५ कोटी रुपये असा उल्लेख आहे. यावरुन नंदलाल यांच्याकडे ५ कोटी रुपयांची खंडणी मारण्यात आल्याचे म्हटले जात आहे. गुरुग्राममधील कुंड कैलाश चौधरीने या घटनेची जबाबदारी स्वीकारली आहे.

२००६ मध्ये नंदलाल हे भारतीय सैन्यातून सुभेदार म्हणून निवृत्त झाले. मागील काही वर्षांपासून ते लुधियानामध्ये रिअल इस्टेटचा व्यवसाय करतात. त्यांचा एक मुलगा डॉक्टर आणि दुसरा मुलगा बँक मॅनेजर आहे. नंदलाल यांच्या घरी झालेल्या गोळीबाराची घटना घडली. प्रत्यक्षदर्शींच्या मते, आज (१९ ऑक्टोबर) पहाटे ३ वाजता लोहारा पुलाच्या दिशेने दुचाकीवरुन काहीजण आले. त्यांनी नंदलाल यांच्या घरावर गोळ्या झाडल्या. गोळीबार केल्यानंतर ते जीएनई कॉलेजकडे पळून गेले.

'ज्या वेळेस गोळीबार झाला तेव्हा मी नातेवाईकासोबत घरी होतो. माझे कुटुंब दिवाळीसाठी राजस्थानमध्ये होते. गोळ्यांनी घराच्या बाहेरील काचा फोडल्या. तेथे १५ गोळ्यांचे गोळे सापडले आहेत, याशिवाय एक जिवंत काडतूस देखील आढळले आहे. माझा गुंड कैलाश चौधरीशी कोणताही संबंध नाही. मी अनेक वर्षे देशाची सेवा केली आहे. सुरक्षा पुरवण्यासाठी मी पोलिसांकडे विनंती केली आहे', असे नंदलाल यांनी म्हटले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

देवीचं दर्शन घेऊन परतताना भाविकांचा भीषण अपघात; १५ जणांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर ट्रकच्या धडकेने उलटला, परिसरात हळहळ

Maharashtra News Live Update: दिल्लीत आंदोलकांना घेऊन जाणाऱ्या बसवर दगडफेक

Property Papers : घराची ओरिजनल कागदपत्र बँकेकडे? कायदेशीर मालकी हक्क कसा सिद्ध कराल?

Heart-Tea : चहाप्रेमींसाठी धोक्याची घंटा! चहा प्यायल्यानंतर हृदयाची धडधड वाढते? दुर्लक्ष करणे पडेल महागात

Salman Khan: बॉलिवूडचा भाईजान आता यूट्यूबवर! सलमान खानने सुरू केलं यूट्यूब चॅनेल, चाहत्यांसोबत शेअर केला पहिला खास व्हिडीओ

SCROLL FOR NEXT