Australia News Saam Tv
देश विदेश

ऑस्ट्रेलियाच्या कॅनबेरा विमानतळावर गोळीबार, १ जण ताब्यात

कॅनबेरा विमानतळावर गोळीबार झाला आहे.

साम वृत्तसंथा

कॅनबेरा: कॅनबेरा विमानतळावर गोळीबार झाला आहे. गोळीबारानंतर मुख्य टर्मिनल रिकामे करण्यात आल्याचे ऑस्ट्रेलियाच्या फेडरल पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. या व्यक्तीकडून एक शस्त्रही जप्त केले आहे. 'सीसीटीव्ही (CCTV) फुटेज पाहिले यानंतर या व्यक्तीला ताब्यात घण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनूसार, कॅनबेरा विमानतळावर ही घटना घडली आहे. या प्रकरणी एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. या गोळीबारात कुणीही जखमी झालेले नाही. या घटनेनंतर तात्काळ कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी (Police) सांगितले.

गोळीबाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून कॅनबेरा विमानतळाचे टर्मिनल रिकामे करण्यात आले आहे. विमानतळावरील परिस्थिती आता नियंत्रणात असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी नागरिकांना यावेळी विमानतळावर न येण्यास सांगितले आहे. शक्य तितक्या लवकर कॅनबेरा विमानतळावरून उड्डाणे पुन्हा सुरू करण्यासाठी काम करत आहेत, असं पोलिसांनी सांगितले. आज दुपारी विमानसेवा पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. विमानांची उड्डाणे सध्या थांबवण्यात आली आहेत, काही विमाने अजूनही प्रवाशांसह धावपट्टीवर उभी आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Smit Machhar : मुंबईचा कॅप्टन स्मित मच्छार ठरला देवदूत! जीव धोक्यात घालून १७४ प्रवाशांचे प्राण वाचवले; नेमकं काय घडलं?

Rajpal Yadav Viral Video: 'तुम्हाला बाहेर जावं लागेल...'; मुश्ताक खान यांच्या शोकसभेतून राजपाल यादवला खरंच बाहेर काढलं?

Maharashtra News Live Update: प्रदीप पुर्णेकर हत्या प्रकरण; ठाणे क्राईम ब्राँचकडून ३ महिला ताब्यात

Phone overheating: फोन वारंवार गरम होत असेल तर काय करावं?

Congress: काँग्रेस भवनाबाहेर आढळला महिला नेत्याच्या नवऱ्याचा मृतदेह, डोक्यात गोळी घुसल्याने मृत्यू

SCROLL FOR NEXT