Shocking News Saam Tv
देश विदेश

Shocking News: पोटात दुखतंय म्हणून तरुणी रुग्णालयात गेली; तपासणी करताच डॉक्टर चक्रावले, असं काय घडलं?

Viral News: सोशल मीडियावर कायम धक्कादायक घटना घडलेल्या समजून येत असतात. सध्या अशीच एक घटना सध्या नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरत आहे.

Tanvi Pol

आपल्यापैंकी अनेकांना पाटीची पेन्सिल किंवा माती खाण्यास आवडते. मात्र पाटीची पेन्सिल किंवा माती अधिक खाल्ल्यानेही अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. पुरुषांपेक्षा महिला वर्गच आपल्याला पाटीची पेन्सिल आणि माती खाताना दिसून येतात. अनेकदा यामुळे महिलांना त्रासही होतो. मात्र तुम्हीही कधी केस खाल्लेले कोणी ऐकल आहे का? मात्र सध्या सोशल मीडियावर एका घटनेची चर्चा सध्या जोरदार व्हायरल होत आहे. ज्यात एका मुलीच्या पोटातून केसांचा भलामोठा गोळा काढण्यात आलेला आहे.

सोशल मीडियावर आपल्याला कायम अनेक धक्कादायक(Shocking) घटना क्षणार्धात समजत असतात. धक्कादायक घटनेत अनेक किस्से आपल्याला धसकावून सोडतात तर काही गोष्टी गोंधळात टाकतात. सध्या असात एक प्रकार उत्तर प्रदेशातून समोर आला आहे. जिथे मुलीच्या पोटातून ऑपरेशन (operation) करुन केसांचा गोळा काढण्यात आलेला आहे.

नक्की कुठं घडलं?

व्हायरल होत असलेली घटना उत्तर प्रदेशातील आहे. जिथे वास्तव्या असलेली एक मुलगी तिच्या वयाच्या १६ वर्षांपासून डोक्यावरचे केस खात होती. मात्र तिचे सध्या वय ३१ वर्ष आहे. वयाच्या एवढ्या गॅपमध्ये तिने डोक्यावरची केस खात आली. मात्र काही वर्षापासून तिच्या पोटात वारंवार दुखत होते. मात्र जेव्हा सारखे पोटात दुखत असल्याने या महिलेने दवाखान्यात धाव घेतली तेव्हा तिला ही धक्कादायक गोष्ट समजली. त्यानंतर ऑपरेशन केल्यानंतर तिच्या पोटातून केसांचा मोठा गोळा काढण्यात आले.

सध्या या महिलेच्या घटनेची सर्वत्र जोरदार चर्चा आहे. मात्र या गोष्टीची सर्वांना माहिती पडताच प्रत्येकाला अनेक प्रश्न निर्माण झाले त्यात ''कोणी केस कसं खावू शकतो'' हा प्रश्न सर्वांधिक होता. मात्र व्हायरल होत असलेल्या बातमीच्या रिपोर्टनुसार, या मुलीला एका ट्रायकोलोटो मॅनिया हा मासिक आजार होतो, त्यामुळे ती वारंवार डोक्यावरचे केस खात होती.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pakistan : मोठी बातमी! पाकिस्तानच्या लष्करी कॅम्पवर हल्ला, १५ सैनिकांचा मृत्यू

IPL 2026: मुंबई इंडियन्सचा कर्णधार पुन्हा बदलणार; पुढच्या KKR विरूद्धच्या सामन्यात 'हा' खेळाडू सांभाळणार धुरा

Maharashtra News Live Update: शिवालयाबाहेर आंबा उत्पादकांंचं आंदोलन

धक्कादायक! गटविकास अधिकार्‍याचा कार्यालयात शेतकऱ्याचा आयुष्य संपवण्याचा प्रयत्न

पेट्रोल-डिझेल दरवाढीनंतर आणखी एक धक्का; विमान तिकीट दर गगनाला भिडले, VIDEO

SCROLL FOR NEXT