new york firing  Saam tv
देश विदेश

Shocking : अंत्ययात्रेत अंधाधुंद गोळीबार; ७ जणांचा जागीच मृत्यू , घटनास्थळी लोकांची धावाधाव

new york firing : न्यूयॉर्कमध्ये अंत्ययात्रेत अंधाधुंद गोळीबार झाल्याची घटना घडली. या घटनेत ७ जणांचा जागीच मृत्यू झाला.

Vishal Gangurde

Firing in Guatemala: न्यूयॉर्कच्या ग्वाटेमालामध्ये अंधाधुंद गोळीबार झाल्याची घटना घडली. या गोळाबारात ७ जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. अंत्ययात्रेत हा गोळीबार झालाय.

मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात बंदूकधारकांनी अंत्ययात्रेतील लोकांवर अंधाधुंद गोळीबार केला. अग्निशमन दलाच्या विभागाने गोळीबार झाल्याच्या घटनेला दुजोरा दिला आहे. न्यूयॉर्कमध्ये सोमवारी एका व्यक्तीचं निधन झालं होतं. या व्यक्तीच्या अंत्यविधीसाठी आलेल्या लोकांवर काही बंदूकधारकांनी अंधाधुंद गोळीबार केला.

या लोकांनी मृत व्यक्तीच्या नातेवाईकांवरच गोळीबार केला. या हल्ल्यात ७ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले. या हल्ल्याती जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गोळीबार होताच काहींनी घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर काहींनी पोलिसांना माहिती दिली.

पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला आहे. गोळीबार करणाऱ्या लोकांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरु केलं आहे. मात्र, बंदुकधारक व्यक्ती घटनास्थळावरून पळ काढण्यात यशस्वी झाले. पोलिसांनी आता परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यास सुरुवात केली आहे.

मिडटाऊन मॅनहट्टनमध्ये गोळीबार, ५ जणांचा मृत्यू

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी अमेरिकेच्या मिडटाऊन मॅनहट्टन भागातही गोळीबार झाल्याची घटना घडली. ४४ मजली इमारतीत घुसून एकाने गोळीबार केला. या गोळीबारात पोलीस अधिकाऱ्यासहित ५ लोकांचा मृत्यू झाला. हल्लोखोराचं नाव शेन तामुरा असल्याची माहिती मिळाली आहे. शेन हा माजी फुटबॉल खेळाडू होता.

शेनने आधी लोकांवर अंधाधुंद गोळीबार केला. त्यानंतर स्वत:वरही गोळी झाडली. त्याने ब्लॅकस्टोन आणि एनएफएल सारख्या अनेक बड्या संघटनांचं कार्यालय असणाऱ्या इमारतींवर गोळीबार केला. गोळीबारांनंतर पोलिसांनी इमारत सील केली आहे. या प्रकरणाची पोलिसांनी सुरुवात केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गणपती विसर्जनाच्या बंदोबस्तानंतर ASI अधिकाऱ्याचा मृत्यू; महाराष्ट्र पोलिस दलात शोककळा

Maharashtra News Live Update: शिवाजी पार्कमधील काँग्रेस आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली

Black Raisins Benefits: दिवसाची सुरुवात करा भिजवलेले काळे मनुके खाण्याने, शरिराला मिळतील हे ७ आरोग्यदायी फायदे

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, आज खात्यामध्ये ₹1500 जमा होणार; लगेच मेसेज चेक करा

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! ₹72 हजार किमान बेसिक पगाराचा प्रस्ताव, फिटमेंट फॅक्टर 4 चर्चेत

SCROLL FOR NEXT