Shocking News Bride gave birth to a baby On the sixth day of marriage Uttar pradesh crime Saam TV
देश विदेश

Shocking News: लग्नानंतर ६ दिवसातच नवरीने दिला बाळाला जन्म; बातमी कळताच नवरा चक्रावला, कुठे घडला प्रकार?

Shocking Viral News: लग्नानंतर ६ दिवसातच नवऱ्या मुलीने बाळाला जन्म दिला. धक्कादायक बाब म्हणजे नवरी प्रेग्नेंट आहे, याची कल्पना नवऱ्या मुलाला नव्हती.

साम टिव्ही ब्युरो

Shocking Viral News

धुमधडाक्यात लग्न लागलं. नवरीला घेऊन नवरा मुलगा घरी आला. घरात नववधूचं आगमन झाल्याने आनंदाचं वातावरण होतं. कुठेतरी देवदर्शनाला जाऊ आणि सुखी संसाराची सुरुवात करू, असा विचार नवऱ्या मुलाच्या मनात होता. पण त्यानंतर जे काही घडलं ते पाहून नवऱ्या मुलासह सासरच्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. लग्नाच्या ६ दिवसातच नवऱ्या मुलीने बाळाला जन्म दिला. (Latest Marathi News)

धक्कादायक बाब म्हणजे नवरी प्रेग्नेंट आहे, याची कल्पना नवऱ्या मुलाला नव्हती. या प्रकारानंतर त्याने नववधूला स्विकारण्यास नकार दिला. एखाद्या सिनेमाच्या कथेलाही लाजवेल, अशी ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद शहरात घडली. या घटनेची सर्वत्र चर्चा होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुराबाद शहरातील (Uttar Pradesh) मुघलपुरा परिसरात राहणाऱ्या एका तरुणाचा आगवानपूर येथील रहिवासी असलेल्या तरुणीसोबत आठवडाभरापूर्वी विवाह झाला होता. लग्नानंतर नवरा मुलगा नवरीला घरी घेऊन आला. घरात नववधूचं आगमन झाल्यानंतर आनंदाचं वातावरण होतं.

लग्नानंतर चौथ्या दिवशी नववधू माहेरी गेली. तिथे तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला. मुलीच्या आई वडिलांनी या घटनेची माहिती मुलाच्या कुटुंबियांना दिली. आपल्या सुनेनं बाळाला जन्म दिल्याचं ऐकताच मुलाच्या कुटुंबियांच्या पायाखालची जमीनच सरकली.

यावरुन दोन्ही कुटुंबियांमध्ये बरीच बाचाबाची झाली. यानंतर तरुणीची चौकशी केली असता तिने शेजारी राहणाऱ्या एका तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचं सांगितलं. त्यानेच तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले होते, अशी कबुली दिली. या घटनेनंतर नवऱ्या मुलाने तरुणीला तिहेरी तलाक दिला.

यानंतर तरुणीने आई-वडिलांसह नवऱ्या मुलाचं घर गाठलं. तिथे गेल्यानंतर मुलीने बाळाला घेऊन सासरच्या घरी जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, सासरच्यांनी तिला घराबाहेर हाकललं. आता हे प्रकरण पोलिसांत गेलं असून तिहेरी तलाक देणाऱ्या नवऱ्याविरोधात गुन्हा दाखल करा, अशी मागणी नवरीने केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT