crime news x
देश विदेश

मौलानाचा खरा चेहरा समोर, तंत्र - मंत्राच्या नावाखाली महिलांचे शोषण, घटना सीसीटीव्हीत कैद

Fake Tantrik Maulana: जोधपूरमध्ये मौलाना अफझलचा घृणास्पद चेहरा समोर आला. तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलांना जाळ्यात अडकवून लैंगिक शोषण. मौलानाचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल.

Bhagyashree Kamble

  • जोधपूरमध्ये मौलाना अफझलचा घृणास्पद चेहरा समोर आला.

  • तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलांना जाळ्यात अडकवून लैंगिक शोषण.

  • मौलानाचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल.

  • आरोपी मौलाना सध्या फरार, पोलिस तपास सुरू.

जोधपूरमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. तांत्रिक मौलाना अफझलचे लज्जास्पद कृत्य समोर आले आहे. तंत्र मंत्राच्या बहाण्याने महिलांना फसवून लैंगिक शोषण करणाऱ्या मौलानाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या व्हिडिओत मौलाना महिलेचे लैंगिक शोषण करत असल्याचं दिसून येत आहे. व्हिडिओ व्हायरल होताच परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मौलाना अफझल स्वत:ला तंत्र - मंत्रात तज्ज्ञ म्हणवून घेत असे. तसेच लोकांच्या समस्या सोडवण्याचा दावा करत असे. तो विशेषत: अशा महिलांना लक्ष्य करायचा, ज्यांना मूल नाही. अशा महिला मौलानाकडे मूल नसल्याचं दुखणं घेऊन जायचे. त्यांच्या विश्वासाचा फायदा घेत तो तांत्रिक विधीच्या बहाण्याने त्यांना आपल्या जाळ्यात अडकवत असे. तसेच अश्लील कृत्य करत असे.

मौलानाचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये मौलाना महिलांसोबत अश्लील कृत्य करताना दिसत आहे. महिला मौलानावर विश्वास ठेवत होते. मात्र, महिलांच्या विश्वासाचा फायदा घेत त्यानं पीडित महिलांचा फायदा घेतला. हे संपूर्ण प्रकरण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.

व्हिडिओ समोर आल्यानंतर लोकांनी संताप व्यक्त केला. त्यांनी आरोपीचा शोध घेण्यास सुरूवात केली. व्हिडिओ समोर येताच मौलाना फरार झाला. पोलिसांकडे व्हिडिओ प्राप्त झाल्यानंतर त्यांनी तपासाला सुरूवात केली आहे. दरम्यान, चेहरा पूर्णपणे स्पष्ट नाही. त्यामुळे आरोपीची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहे.

आतापर्यंत कुणीही औपचारिक तक्रार दाखल केलेली नाही. परंतु , पोलिसांकडून तपास सुरू आहे. या व्हिडिओमुळे मौलानाचा खरा चेहरा समोर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate: खरेदीची सुवर्णसंधी! आठवडाभरात सोनं ७००० तर चांदी १४००० रुपयांनी स्वस्त; वाचा सुवर्णनगरीतील आजचे दर

Lemon storage tips: लिंबू सुकू नयेत म्हणून ‘या’ पद्धतीने करा स्टोअर, महिनाभर राहतील फ्रेश

Maharashtra News Live Update: ‘मुलुंडचा आमदार चोरीला गेला’; काँग्रेसचे राकेश शेट्टी यांची पोलिसांत तक्रार

New Rule : 1 ऑक्टोबरपासून सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम! ATM ते LPG पर्यंत 5 नवे नियम लागू, वाचा सविस्तर

Car tyre replacement: किती किलोमीटर्सनंतर कारचे टायर बदलले पाहिजेत?

SCROLL FOR NEXT