Viral Video Saam TV
देश विदेश

Viral Video: उत्तर प्रदेशमध्ये नग्न महिलेची भीती; रात्रीच्या अंधारात डोअरबेल वाजवून गायब, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

धक्कादायक बाब म्हणजे ही महिला नग्न अवस्थेत परिसरात फिरत आहे.

Ruchika Jadhav

Viral Video: उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक महिला रात्रीच्या वेळी लोकांच्या घराची डोअरबेल वाजवून तेथून पळ काढत आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही महिला नग्न अवस्थेत परिसरात फिरत आहे. सदर घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. (Latest Viral Video)

रामपुर परिसरात ही घटना घडली आहे. सदर महिला आपले केस मोकळे ठेवून काहीतरी बोलत असल्याचं सीसीव्हीमध्ये दिसत आहे. २९ जानेवारी रोजी तिने रामपुरमधील काही व्यक्तींच्या घराची डोअरबेल बाजवली होती. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. महिला नसून हे भूत असावे अशी चर्चा परिसरात सुरू होती.

दरम्यान रामपुर पोलिसांत या विषयी माहिती देण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी या परिसरात रात्रीच्या वेळी लक्ष ठेवले तसेच सदर महिलेला अटक केली आहे. ही महिला एक मनोरुग्ण असल्याचं तपासात समोर आलं आहे. महिलेच्या कुटुंबियांना याची माहिती दिली असून तिला कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आलं आहे. तसेच पुन्हा असा प्रकार घडणार नाही याकडे लक्ष देण्यास पोलिसांनी सांगितलं आहे.

सदर घटनेत रामपुर पोलिसांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर या बाबत एक पोस्ट शेअर करत याची माहिती दिली आहे. महिला मनोरुग्ण असल्याने ती असे करत होती असं त्यांनी म्हटलं आहे. सदर घटनेतील सीसीटीव्ही फुटेज देखील सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल झाले आहे. मात्र यात महिला आणि तिच्या कुटुंबियांच्या गोपनीयतेचा आदर राखण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: चिपळूण शहरातील पेठमाप परिसरातील भर लोकवस्तीत शिरली मगर

समुद्रातल्या जहाजात चोरी करायला गेले, चार चोरांचा मृत्यू; मुंबईतील खळबळजनक घटना

Apple Vs Guava: सफरंचद की पेरू, डायबिटीजच्या रूग्णांनी कोणते फळ खावे?

Property Registration : जमिनीच्या खरेदी-विक्री, वाटणीसह ६३ प्रकारच्या नोंदीसाठी आधार सक्तीचे, फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय

Raigad Fort : तटबंदी नाही, बुरुज नाहीत; तरीही खास आहे रायगडचा 'हा' किल्ला

SCROLL FOR NEXT