Panjab Crime News  Saam TV
देश विदेश

Crime News : ४ महिलांकडून तरुणावर सामूहिक अत्याचार; जालंधरमधील धक्कादायक घटना

जालंधरमध्ये चार महिलांनी मिळून माझ्यावर सामूहिक बलात्कार केला, असा आरोप एका तरुणाने केला आहे.

साम टिव्ही ब्युरो

Panjab Latest Crime News : देशात महिला अत्याचाराच्या घटना वाढत असताना, पंजाबच्या जालंधरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जालंधरमध्ये चार महिलांनी मिळून माझ्यावर सामूहिक बलात्कार केला, असा आरोप एका तरुणाने केला आहे. कामावरून परतत असताना चार महिलांनी पत्ता विचारण्याचं नाटक केलं. त्यानंतर मला बेशुद्ध करत नऊ ते दहा तास बंदी बनवत सामूहिक अत्याचार केला, असा आरोप या तरुणाने केला आहे. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

नेमकं काय घडलं?

बलात्काराचा आरोप करणार्‍या तरुणाचे म्हणणे आहे की, ज्या महिलांनी त्याच्यावर बलात्कार केला त्यांचे वय 23 ते 26 वर्षांच्या दरम्यान आहे. तक्रारदार तरुणाचे लग्न झाले असून त्याला दोन मुलेही आहेत.

तरुणाने पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीनुसार, तो एका खासगी कंपनीत काम करतो. सोमवारी तो कामावरून घरी परतत असताना, वाटेतच त्याला चार महिलांनी रोखलं. पत्ता विचारण्याच्या बहाणा करून या महिलांनी त्याच्या तोंडावर स्प्रे  (Crime News)  मारला. त्यानंतर सदरील तरुण हा बेशुद्ध झाला.

तक्रारदार तरुणाचे म्हणणे आहे, की त्याला जेव्हा शुद्ध आली तेव्हा तो नग्नावस्थेत एका कारमध्ये होता. त्याचे हातपाय बांधलेले होते. डोळ्यावरही पट्टी बांधण्यात आली होती. या कारमध्ये चार महिला मद्यपान करत होत्या. या महिलांनी आळीपाळीने त्याच्यावर बलात्कार देखील केला.

अत्याचारानंतर या महिलांनी तक्रारदार तरुणाला एका अज्ञातस्थळी नेऊन सोडलं आणि कारमध्ये बसून पळ काढला. दरम्यान, घरी आल्यानंतर या तरुणाने आपल्यासोबत घडलेला प्रकार पत्नीला सांगितला. बदनामीपोटी पत्नीने त्याला पोलिसांत (Police) तक्रार करू दिली नाही. मात्र, हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर त्याने पंजाब पोलिसांत तक्रार दाखल केली. सदरील तरुणाच्या तक्रारीवरून पोलिस आता या चार महिलांचा शोध घेत आहेत.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : शेगाव येथील चिंचोलीजवळ शेतातील चारा कुटाराला भीषण आग; लाखोंचे नुकसान

Summer Skin Care: उन्हाळ्यात कोणत्या प्रकारचे सनस्क्रीन वापरावे? खरेदी करताना या गोष्टींची घ्या काळजी

Long Hair Tips: 1 महिन्यातच केस दुपटीने वाढतील, रोज रात्री कांदा आणि नारळाचा 'हा' तेल लावा

जम्मू-श्रीनगर आता फक्त काही तासांत! वंदे भारत एक्सप्रेसचा शुभारंभ, कसा असणार मार्ग आणि वैशिष्ट काय?

Shahajiraje Movie: स्वराज्याच्या पाया रचणाऱ्या शूर योद्ध्याची कहाणी; महाराष्ट्र दिनी 'शहाजीराजे' चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT