Jodhpur Accident news Saam Tv News
देश विदेश

Accident : मुख्यमंत्री ज्या रस्त्याने जाणार होते, त्याआधीच भीषण अपघात; विद्यार्थ्याचा मृत्यू, आईवडिलांचा रस्त्यावरच आक्रोश

Student Dies in Horrific Hit-and-Run: जोधपूरच्या रेसिडेन्सी रोडवर हिट अँड रन अपघातात विद्यार्थ्याचा मृत्यू. मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या भेटीच्या काही अंतरावर घटना. धडक दिल्यानंतर वाहनचालक गाडी घेऊन पळून गेला.

Bhagyashree Kamble

  • जोधपूरच्या रेसिडेन्सी रोडवर हिट अँड रन अपघातात विद्यार्थ्याचा मृत्यू

  • मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या भेटीच्या काही अंतरावर घटना

  • धडक दिल्यानंतर वाहनचालक गाडी घेऊन पळून गेला

  • स्थानिकांनी आरोपीला अटक करण्याची मागणी करत आंदोलन केले

जोधपूरच्या रेसिडेन्सी रोडवर हिट अँड रनचं प्रकरण उघडकीस आले आहे. स्वातंत्र्य दिनी एका अज्ञात वाहनाने शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्याला धडक दिली. या धडकेत विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर चालक गाडी घेऊन फरार झाला. ही घटना तेव्हा घडली, जेव्हा मुख्यमंत्री भजनलाल शर्मा हे शहीद स्मारकाजवळील कार्यक्रमस्थळी जाण्यासाठी रवाना झाले होते. शर्मा कार्यक्रमस्थळी पोहोचणार होते. मात्र, आधीच हा अपघात घडला.

नेमकं घडलं काय?

शुक्रवारी सकाळी मुख्यमंत्र्यांच्या आगमनापूर्वी एक दुर्देवी घटना घडली. रेझिडेन्सी रोडवरील एका शाळेतील विद्यार्थी रस्ता ओलांडत होता. यावेळी एका भरधाव वाहनाने विद्यार्थ्याला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, विद्यार्थी फरफटत गेला. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर चालक वाहन घेऊन फरार झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनात खळबळ उडाली. मुख्यमंत्री भजनलाल शर्मा कार्यक्रमस्थळी पोहोचण्याआधी अपघात घडल्यानं पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. विद्यार्थ्याच्या मृत्यूमुळे संतप्त झालेल्या कुटुंबियांनी रस्त्यावर आक्रोश व्यक्त केला. आरोपींना तात्काळ अटक करण्याची आणि न्याय देण्याची मागणी ते करत होते.

पोलिसांनी तात्काळ कारवाई करण्यास सुरूवात केली. त्यांनी कुटुंबाशी संवाद साधून त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी कुटुंबाला आश्वासन दिले की, आरोपीला लवकरच ताब्यात घेऊ, तसेच त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. दरम्यान, या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'जोपर्यंत CM तोपर्यंत लाडकी बहीण योजना'; मुख्यमंत्री फडणवीसांनी योजनेबाबत दिला शब्द

Shocking: लग्नाला ३ वर्षे झाली, तरीही मुल होत नाही; टेन्शनमध्ये शक्तीवर्धक गोळ्या खाल्ल्या, तरुणासोबत भयंकर घडलं

Crime News: माध्यमिक शाळेची शिक्षिका चॅटिंग करत पाठवायची बाथरूमचे फोटो, नंतर घरी बोलवायची अन्....

RSS संविधान आणि तिरंगा मानत नाही, कारण...; सुजात आंबेडकर नेमकं काय म्हणाले? VIDEO

Dilip Walse Patil : माझं राजकीय वजन कमी झालंय; दिलीप वळसे पाटील असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT