Dhirendra Shastri Saamtv
देश विदेश

Dhirendra Shastri Controvercy: धीरेंद्र शास्त्री पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात; साईबाबांवरील प्रश्नावर म्हणाले, गीदड की खाल...

त्यांच्या या वक्तव्याने लखो भाविकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.

साम टिव्ही ब्युरो

Dhirendra Shastri on Saibaba : शिर्डी आणि तेथील थोर संत साईबाबा यांचे देशातच नाही तर परदेशातही लाखो भक्त आहेत. अशात बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांनी साईबाबांवर एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. साईबाबांवर विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना बागेश्वर महाराज यांनी गिधाडाची चमडी असा शब्द वापरला आहे. तसेच साईबाबांना इश्वर मानण्यास नकार दिला आहे. त्यांच्या या वक्तव्याने लखो भाविकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. (Dhirendra Shastri)

गेल्या काही दिवसांपासून धीरेंद्र् शास्त्री भगवत गीतेचं पारायण करत होते. शनिवारी या पारायणाचा शेवटचा दिवस होता. त्यावेळी उपस्थित व्यक्ती आणि धीरेंद्र शास्त्री यांच्यामध्ये साईबाबांवरून चर्चा सुरू होती. यावेळी तेथील एका व्यक्तींने साईबाबांची पूजा करावी की करू नये? असा प्रश्न विचारला. त्यावेळी धीरेंद्र् शास्त्री यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

काय म्हणाले धीरेंद्र् शास्त्री?

साईबाबांची पूजा करावी की करू नये? या प्रश्नावर उत्तर देत धीरेंद्र् शास्त्री म्हणाले की, "गीधाडाची चमडी लावल्याने कोणीही वाघ बनत नाही. शंकाराचार्यांनी साईबाबांना इश्वराचे स्थान दिलेले नाही. त्यामुळे त्यांचं हे मत मानणं आमच्यासाठी अनिवार्य आहे. प्रत्येक सनातनी व्यक्तीचं हे कर्तव्य आहे. कारण शंकाराचार्य धर्माचे पंतप्रधान आहेत. त्यामुळे साईबाबांना इश्वराचे स्थान देता येणार नाही.

तुलसीदास, सूरदास अशा सर्वच व्यक्ती या देव नाही तर महापुरुष आणि संत असतात. मात्र ते इश्वर नसतात. मला कुणाच्या भावना दुखवायच्या नाहीत मात्र हेच सत्य आहे. साईबाबांना आपण फक्त संत म्हणू शकतो, असं धीरेंद्र् शास्त्री यांनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pitru Paksha : पितृपक्षात आवर्जून बनवा भोपळ्याची भाजी, कांदा-लसूणशिवायही लागेल एकदम चविष्ट

Bribe Case : पोलीस अधिकाऱ्याने ₹१३०००० घेतले, पण अचानक ACB चं पथक धडकले, लाचखोर PSI कसा अडकला जाळ्यात

Car Engine Oil: किती किलोमीटर्सनंतर कारचं इंजिन ऑईल बदललं पाहिजे?

Maharashtra News Live Update: पुण्याचे ग्राम दैवत कसबा गणपती मंदिरात चोरट्यांचा डल्ला

Hingoli Fire : अनाधिकृत फटाक्यांच्या गोडाऊनला भीषण आग; ३ जणांचा मृत्यू, दुचाकी चालकाचा कोळसा, ११ जखमी

SCROLL FOR NEXT