Kangana Ranaut Vote In Mandi Lok Sabha X
देश विदेश

Kangana Ranaut Vote In Mandi Lok Sabha : नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, कंगना रणौतला विश्वास, मतदानानंतर काय म्हणाली अभिनेत्री?

Mandi Lok Sabha Voting 2024 : अभिनेत्री कंगना रणौत हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभेतून निवडणूकीच्या रिंगणात उतरली आहे. अभिनेत्रीने हिमाचल प्रदेशातच आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.

Chetan Bodke

लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यासाठी आज शनिवारी मतदानाला सुरूवात झाली आहे. एकूण ७ राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील ५७ जागांसाठी हे मतदान पार पडत आहे. सकाळी ७ वाजेपासून मतदानाला सुरुवात झालेली आहे. यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत हिच्यासह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. अभिनेत्री कंगना रणौत हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभेतून निवडणूकीच्या रिंगणात उतरली आहे. अभिनेत्रीने हिमाचल प्रदेशातच आपला मतदानाचा हक्क बजावला असून तिने मतदानानंतर आपली प्रतिक्रिया दिलेली आहे.

माध्यमांसोबत संवाद साधताना कंगना रणौत म्हणाली, " मी नुकताच माझा मतदानाचा हक्क बजावला आहे. मी सर्व हिमाचल प्रदेशवासियांना सांगते की, सर्वांनीच आपला मतदानाचा हक्क बजवावा. माझ्याप्रमाणेच तुम्हीही लोकशाहीच्या उत्सवामध्ये सहभाग नोंदवला पाहिजे. आज मला आमच्या मतदारसंघात एका सणाप्रमाणेच लोकांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. आपल्या अधिकारांसाठी अनेकांनी प्राणाची आहुती दिलेली आहे. त्यामुळे आपण सर्वांनी नक्कीच मतदानाचा हक्क बजवायला हवा. "

यावेळी अभिनेत्रीने पुन्हा एकदा पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदीच निवडून येतील, असा विश्वास व्यक्त केला आहे. अब की बार ४०० पार म्हणत तिने विरोधकांवरही टीका केली आहे. मला लोक मंडी लोकसभेतून नागरिकांची सेवा करण्याची संधी देतील, असाही विश्वास तिने माध्यमांसोबत बोलताना व्यक्त केला आहे. कंगना एक सुप्रसिद्ध अभिनेत्री असून लवकरच तिचा 'इमरजन्सी' नावाचा चित्रपट रिलीज होणार आहे. पण अद्याप तिने चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ketan Agarwal Case: लोहगडावर पोलिसांकडून सीन रिक्रिएशन, केतनला ढकललं त्याठिकाणी सियाला नेण्यात आलं; नेमकं काय घडलं?

Harshad Chopda: 'गर्लफ्रेंडने बेस्ट फ्रेंडसोबत मला चीट...'; प्रसिद्ध अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा

Maharashtra News Live Update: शेतकरी उपाशी आहेत, विकास करणाऱ्यांचा विमानाने प्रवास - उद्धव ठाकरे

पार्लरमध्ये जाण्याची गरज कशाला? 'या' ५ सोप्या स्टेप्सने घरीच करा फेशियल; चेहऱ्यावर येईल नॅचरल ग्लो!

Pune : माय-लेकांवर एकाच वेळी अंत्यसंस्कार; पुण्यात काळजाचा थरकाप उडवणारी घटना

SCROLL FOR NEXT