माध्यमांविरोधात शिल्पा शेट्टीने दाखल केला अब्रू नुकसानीचा दावा !  ANI
देश विदेश

माध्यमांविरोधात शिल्पा शेट्टीने दाखल केला अब्रू नुकसानीचा दावा !

माध्यमांनी प्रसारित केलेल्या चुकीच्या वृत्तांमुळे आपली मोठ्या प्रमाणावर बदनामी झाली असून माध्यमांनी जाणीवपूर्वक अश्याप्रकारे वार्तांकन केल्याचा आरोप तिने केला आहे.

वृत्तसंस्था

मुंबई : पोर्नोग्राफी Pornography प्रकरणात Case प्रसारमाध्यमांनी चुकीचे वृत्त प्रसारित करून आपली बदनामी केल्याचा आरोप करत अभिनेत्री शिल्पा शेट्टीने मुंबई उच्च न्यायालयात २९ जणांविरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला आहे. शिल्पा शेट्टी Shilpa Shetty आणि तिचा पती राज कुंद्रा Raj Kundra यांच्याविरोधात दाखल केलेल्या दाव्यात तिने म्हटले आहे कि, माध्यमांनी प्रसारित केलेल्या चुकीच्या वृत्तांमुळे आपली मोठ्या प्रमाणावर बदनामी झाली असून माध्यमांनी जाणीवपूर्वक अश्याप्रकारे वार्तांकन केल्याचा आरोप तिने केला आहे.

त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात आता शिल्पा शेट्टीने आक्रमक पावित्रा घेतला आहे. ANI ने ट्विटच्या माध्यमातून दिलेल्या माहितीनुसार, शिल्पा शेट्टीने २९ माध्यमांच्या विरोधात हा दावा दाखल केला असून, त्यात अनेक मोठ्या पत्रकारांचा समावेश आहे. ज्या माध्यमांनी आपली नाहक बदनामी आणि प्रतिमाभंजन केले आहे, अश्या माध्यमांविरोधात न्यायालयात Court दाद मागणार असल्याचेही शिल्पा शेट्टीने सांगितले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिल्पा शेट्टीने ज्या माध्यमांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा Defamation Suit दाखल केला आहे, त्यात तिने बिनशर्त माफी व २५ कोटी रुपयांची भरपाई करण्याची मागणी बदनामी करणाऱ्यांविरोधात कोर्टात केली आहे. या प्रकरणावर उद्या कोर्टात सुनावणी होणार आहे.

By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यातील खराडी भागात आगीची घटना

भाजपची राज्यसभेसाठी ११ नावांची घोषणा; २ बड्या केंद्रीय मंत्र्यांचा पत्ता कट, मोदी मंत्रिमंडळात फेरबदल होणार?

8th Pay Commission : कामाची बातमी! केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या टेक होम पगारात मोठी वाढ? सरकार लागू करू शकतं हा फॉर्म्यूला

वजन वाढणारच नाही! सकाळी नाश्त्याला अरबट-चरबट खाण्यापेक्षा खा 'हे' 4 हाय-प्रोटीन पदार्थ; दिवसभर राहाल फिट

Paranoia symptoms: प्रत्येक गोष्टीत कटकारस्थान दिसतंय? तज्ज्ञांनी सांगितली पॅरानोइयाची धोकादायक लक्षणं आणि कारणं

SCROLL FOR NEXT