Shapoorji Pallonji Chairman Pallonji Mistry passes away at 93 saam tv
देश विदेश

Pallonji Mistry News : पद्म भूषण पालोनजी मिस्त्री यांचं निधन

पालोनजी मिस्त्री यांच्या निधनाने विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

साम न्यूज नेटवर्क

पुणे : शापूरजी पालोनजी समूहाचे (Shapoorji Pallonji Group) चेअरमन पालोनजी मिस्त्री (Pallonji Mistry) यांचे आज (मंगळवार) निधन झाले. ते 93 वर्षाचे हाेते. त्यांच्या पश्चात दोन मुले शापूर मिस्त्री (Shapoor Mistry) आणि सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) आणि दोन मुली लैला मिस्त्री (Laila Mistry) आणि आलू मिस्त्री (Aloo Mistry) असे कुटुंब आहे. (Shapoorji Pallonji Chairman Pallonji Mistry passes away at 93)

शापूरजी पालोनजी समूह देश-विदेशात विविध व्यवसायात अग्रभागी राहिला आहे. यामध्ये बांधकाम, रिअल इस्टेट, आर्थिक सेवां आदींचा समावेश आहे. या समूहात 50 हजार पेक्षा अधिक लोक काम करीत आहेत. सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांनी एकदा टाटा सन्सचं अध्यक्षपद भूषविले हाेते. एका वादानंतर सायरस मिस्त्री यांनी राजीनामा (resignation) दिला.

पालोनजी मिस्त्री यांना सन 2016 कालावधीत पद्म भूषण पुरस्कारानं (Padma Bhushan Award) सन्मानित करण्यात आले होते. हा देशातील (India) तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार मानला जाताे. पालोनजी मिस्त्री यांच्या निधनाने विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ठाणे ते बोरिवली प्रवास १५ मिनिटांत होणार, मुख्यमंत्र्यांकडून गेमचेंजर प्रकल्पाचे शुभारंभ, काय आहेत वैशिष्ट्ये?

Pawan Khera House Raid : काँग्रेसच्या बड्या नेत्याच्या घरावर छापेमारी; विधानसभा निवडणुकीआधी मोठी कारवाई; हैदराबादला पळाल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार, भरधाव टँकरने तरुणीला चिरडलं

Maharashtra News Live Update: भयंकर! वारजेमध्ये वाहतूक पोलिसाच्या अपहरणाचा प्रयत्न

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! दररोज ३०० रुपये गुंतवा अन् १५ लाख मिळवा; फक्त व्याजातून मिळणार ४.४० लाख

SCROLL FOR NEXT