BJP woman leader Shakuntala Arya political journey saam tv
देश विदेश

भाजपच्या दिग्गज महिला नेत्याचे निधन; मुख्यमंत्र्यांसह वरिष्ठ नेते अंत्यविधीत, राजकीय वर्तुळात शोककळा

Shakuntala Arya Former Delhi Mayor Death News Details: दिल्लीच्या माजी महापौर आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्या शकुंतला आर्य यांचे 98 व्या वर्षी निधन. त्यांच्या निधनामुळे राजकीय वर्तुळात शोककळा पसरली असून वरिष्ठ नेत्यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

Omkar Sonawane

शकुंतला आर्य 1980 पासून भाजपसोबत जोडल्या होत्या आणि 2010 पर्यंत त्या दिल्लीमध्ये राजकारणात सक्रिय होत्या. 1997-98 या काळात त्या दिल्लीतील भाजपच्या महिला महापौर होत्या. पक्षाच्या स्थापनेच्या वेळी त्या संस्थापक सदस्यांपैकी एक होत्या, त्यांनी अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण आडवाणी यांच्यासोबतही काम केले होते. आज शनिवार (25 जुलै) त्यांचा अंत्यसंस्कार दिल्लीतील लोधी रोड स्मशानभूमीत केला जाणार आहे. या अंत्यसंस्काराल मुख्यमंत्री रेखा गुप्ता या देखील आपले नियोजन कार्यक्रम रद्द करत उपस्थित होत्या.

त्यांच्या निधनानंतर भाजपचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष हर्ष मल्होत्रा यांनी तीव्र शोक व्यक्त केला असून कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी सांगितले की 1980 च्या दशकापासून ते 2010 पर्यंत जे काम केले आहे ते अविस्मरणीय आहे. त्या महिला सशक्तीच्या खरी प्रेरणा होत्या.

मागील वर्षी भाजपच्या स्थापना दिनानिमित्त (६ एप्रिल) तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा आणि सध्याचे प्रदेशाध्यक्ष तसेच केंद्रीय राज्यमंत्री हर्ष मल्होत्रा यांनी त्यांच्या लाजपत नगर येथील निवासस्थानी जाऊन पक्षाचा ध्वज फडकावला होता. शकुंतला आर्य या दिल्ली भाजप महिला मोर्चाच्या पहिल्या अध्यक्षा देखील होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT