Cervical Cancer Vaccine Saam TV
देश विदेश

Cervical Cancer: सर्वाइकल कॅन्सर विरोधी पहिली स्वदेशी लस तयार, सीरम इन्स्टिट्यूट उद्या करणार लाँच

भारतात दरवर्षी अनेक महिलांचा गर्भाशयाच्या कर्करोगाने मृत्यू होतो.

Jagdish Patil

Cervical Cancer Vaccine : भारतात दरवर्षी अनेक महिलांचा गर्भाशयाच्या कर्करोगाने मृत्यू होतो. मात्र, या घातक आजारावर मात करणारी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे गर्भाशयाच्या कर्करोगावरील लस सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने तयार केली आहे. (Serum Institute of India)

गर्भाशय कर्करोगाच्या (Cervical Cancer Vaccine) रुग्णांसाठी सीरम इन्स्टिट्यूटने 'क्वाड्रिव्हॅलेंट ह्युमन पॅपिलोमाव्हायरस' (qHPV) ही स्वदेशी लस विकसित केली असून सीरम इन्स्टिट्यूट आणि डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी (DBT) पुढील महिन्यात म्हणजे उद्याच १ सप्टेंबर रोजी ही लस (qHPV) लाँच करणार आहेत, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.

१५ ते ४४ वर्षे वयोगटातील महिलांना सर्वाधिक गर्भाशय कर्करोग होण्याच्या आकडेवारीत भारत हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे ही लस अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. तसंच डिसेंबर २०२२ पर्यंत qHPV या लशीचे १ कोटी डोस विकसित करणार असल्याची माहिती सीरम इन्स्टिट्यूकडून केंद्र सरकारला दिली आहे.

पाहा व्हिडीओ -

ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने १२ जुलै रोजी सीरमला qHPV लस तयार करण्यासाठी अधिकृत रित्या परवानगी दिली होती. सीरमने तयार केलेली qHPV ही लस खूप प्रभावी असल्याचं सांगण्यात येत आहे.

९ ते १४ वयोगटातील मुलींसाठी लस -

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ९ ते १४ वयोगटातील मुलींना ही लस दिली जाऊ शकते. सुरुवातीला ही लस फक्त मुलींना दिली जाईल, नंतर ती मुलांनाही दिली जाणार असल्याची माहिती देखील सुत्रांनी दिली आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thane Waterfall : पावसाळ्यात माथेरान, महाबळेश्वर विसरा; ठाण्यात लपलेला 'हा' धबधबा वीकेंड ट्रिपसाठी बेस्ट

Maharashtra News Live Update: नसरापूर प्रकरणाचा आज न्यायालयात निकाल

Maharashtra politic : ६ खासदार फुटल्यानंतर ठाकरेंना आणखी धक्का, अंबादास दानवे महायुतीच्या गोटात, राजकारणात खळबळ

Sambhajinagar : प्ले स्कूलमधील निष्काळजीपणाचा कळस! २३ महिन्यांच्या चिमुकल्याला गंभीर दुखापत, ६ जणांविरोधात गुन्हा

Skin Infection : पावसाळ्यात होऊ शकतं फंगल इन्फेक्शन, सुरुवातीची ही ७ लक्षण ओळखा नाहीतर...

SCROLL FOR NEXT