Girija Vyas passes away 
देश विदेश

Girija Vyas passes away: काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन; पूजेदरम्यान साडीला लागली होती आग

Girija Vyas passes away : काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास नवरात्राच्या पूजेदरम्यान गंभीररित्या भाजल्या होत्या. त्यांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Bharat Jadhav

काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या माजी केंद्रीय मंत्री गिरिजा व्यास यांचं आज निधन झालं. त्या ७९ वर्षांच्या होत्या. काही दिवसांपूर्वी नवरात्रीच्या पूजा दरम्यान त्यांच्या साडीला आग लागली होती. त्या आगीत त्या ९० टक्के भाजल्या गेल्या होत्या. त्यांना अहमदाबादच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण त्याची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली.

मार्च महिन्याच्या अखेरच्या दिवशी नवरात्राच्या पूजेदरम्यानगिरीजा व्यास यांच्या साडी पेटली होती. त्या आगीत त्या गंभीररित्या भाजल्या होत्या. राजस्थानच्या उदयपूरमध्ये गिरिजा व्यास नवरात्राच्या पूजेवेळी आरती करत होत्या, तेव्हा अचानक त्यांचा पदर दिव्याला लागला आणि त्यांच्या साडीला आग लागली होती. साडीला आग लागल्यानंतर गिरिजा व्यास यांनी मदतीसाठी आवाज देऊ लागल्या. तेव्हा तिथे उपस्थित असलेले कर्मचाऱ्यांनी आग विझवली.

पण या आगीत गिरिजा व्यास ९० टक्के भाजल्या गेल्या होत्या. त्यांना उदयपूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर चांगल्या उपचारांसाठी त्यांना आता अहमदाबादला पाठवण्यात आलं. गेल्या महिन्याभरापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

अवघ्या २५ व्या वर्षी आमदार

गिरिजा व्यास उदयपूर लोकसभा मतदारसंघातून चार वेळा खासदार म्हणून निवडून आल्या होत्या. त्या अवघ्या २५ व्या वर्षात आमदार झाल्या होत्या. नरसिंह राव सरकारमध्ये त्यांना माहिती आणि प्रसारण मंत्रालय, तसेच यूपीए-२ मधील मनमोहन सरकारमध्ये त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं होतं. शहरी गृहनिर्माण, दारिद्र्य निर्मूलन मंत्रालयाची जबाबदारी त्यांनी सांभाळली होती.

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून त्यांनी काम पाहिलं होतं. डॉ. गिरिजा व्यास राजस्थान प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षाही होत्या. एआयसीसीच्या मुखपत्र 'काँग्रेस संदेश' मासिकाच्या त्या मुख्य संपादक देखील होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे आणि सरकार मधील कोंडी उपोषणाच्या 12 व्या दिवशीही कायम

Bigg Boss 20 : पहिल्या आठवड्यात नॉमिनेट झाले 'हे' स्पर्धक; घराला कोण करणार टाटा-बाय बाय? खेळाची रंगत वाढतेय

Ladki Bahin Yojana: 'या' महिलांच्या खात्यात जमा होणार ऑगस्टचे ₹१५००; यांचे पैसे कायमचे होणार बंद, पाहा महत्त्वाची अपडेट

Hemraj Shah : मोठी बातमी! ठाकरेसेनेच्या नेत्याचे मुंबईत निधन, राजकीय वर्तुळात शोककळा

मोठी बातमी: लंडनमध्ये ऐनवेळी विमानांचे मार्ग बदलले! उपमुख्यमंत्र्यांचे ६ अधिकारी स्वित्झर्लंडमध्ये अडकले; काय घडलं?

SCROLL FOR NEXT