Seema Haider In 2024 Election Saam Tv
देश विदेश

Seema Haider In 2024 Election: सीमा हैदर 2024 ची निवडणूक लढवणार? एनडीएच्या मित्रपक्षाकडून मिळाली मोठी ऑफर

साम टिव्ही ब्युरो

Seema Haider In 2024 Election: पाकिस्तानातून आपल्या प्रियकरासाठी चार मुलांसह भारतात पोहोचलेल्या सीमा हैदर ही आता पुन्हा एकदा नवीन कारणामुळे चर्चेत आहे. सीमा हैदर तिचा प्रियकर सचिन मीनासोबत नोएडा येथे राहत आहे. सीमावर पाकिस्तानी गुप्तहेर असल्याचा आरोप झाला. काहींनी ती प्रेमात वेडी असल्याचं म्हटलं.

यातच आता अशी बातमी समोर आली आहे की, सीमा हैदर 2024 च्या लोकसभा निवडणुकीत खासदारकीची निवडणूक लढवू शकते. एनडीएचा मित्रपक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाकडून सीमा हिला ऑफर मिळाल्याचे वृत्त आहे. सीमा हैदर हिने हा प्रस्ताव मान्य केल्याचेही बोलले जात आहे.

पाकिस्तानातून आलेली सीमा हैदर आणि भारतातून पाकिस्तानात गेलेली अंजू सध्या चर्चेत आहे. एकीकडे अंजू प्रेमात इतकी वाहत गेली की, ती पती आणि दोन मुलं सोडून पाकिस्तानात तिचा फेसबुक प्रियकरसाठी नसरुल्लाची फातिमा बनली. तिथे तिच्यावर भेटवस्तूंचा वर्षाव होत आहे. तिला नोकरीच्या ऑफरही आल्या आहेत. (Latest Marathi News)

त्याचवेळी पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदर हिलाही आता मोठ्या ऑफर्स मिळत आहेत. काही दिवसांपूर्वी सीमा आणि सचिन मीना यांना नोकरीच्या ऑफर आल्या होत्या. यासोबतच चित्रपटात नायिकेच्या भूमिकेसाठीही सीमाला ऑफर मिळाली आहे.

आता सीमा हैदर 2024 च्या लोकसभा निवडणुकीत खासदारकीची निवडणूक लढवू शकते, अशी चर्चा आहे. एका वृत्तानुसार, सीमा हैदर हिलारिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाकडून पक्षात येण्याची ऑफर आली आहे. दुसरीकडे सीमा हिनेही पक्षाचा हा प्रस्ताव मान्य केला असल्याचं बोललं जात आहे.

सीमा हैदर हिला पक्षाकडून निमंत्रण मिळाल्याची माहिती पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मासूम किशोर यांनी दिली. सीमाला महिला संघटनेचं अध्यक्षपद दिलं जाऊ शकतं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai News: धक्कादायक! वांद्रे वरळी सी-लिंकवरून उडी मारुन कॅब चालकाची आत्महत्या; कारण काय?

Blood Test for Depression : ब्लड टेस्टने ओळखता येणार मानसिक आजार? तंत्रज्ञानामुळे निदान होणार झटपट ? पाहा VIDEO

EPFO खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी! निवृत्तीनंतर मिळणार १ कोटी रुपये, जाणून घ्या कसे?

Manoj Jarange Patil : मुख्यमंत्र्यांना आताच फोन लावा, त्या अधिकाऱ्याला इथूनच आऊट करतो; मनोज जरांगे कुणावर भडकले?

Accident News: लातूर- सोलापूर महामार्गावर भीषण अपघात! प्रवाशांनी भरलेली ट्रॅव्हल्स उलटली; अनेकजण जखमी

SCROLL FOR NEXT