school open saam tv
देश विदेश

देशातील 15 राज्यांमध्ये शाळांची घंटा वाजली, इतर राज्यातील मुलं अजूनही प्रतीक्षेत

यापूर्वी 1 फेब्रुवारी पासून अनेक राज्यांनी शाळा उघडण्याचा निर्णय घेतला होता. अशा प्रकारे, आता देशातील 15 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मुले पुन्हा शाळेत जाऊ शकतील.

Shivani Tichkule

उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, गुजरात, केरळ, बिहार आणि दिल्लीत सोमवारी तिसरी लाट कमी होण्याची चिन्हे दिल्यानंतर शाळा (School) उघडण्याचा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी 1 फेब्रुवारी पासून अनेक राज्यांनी शाळा उघडण्याचा निर्णय घेतला होता. अशा प्रकारे, आता देशातील 15 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मुले पुन्हा शाळेत जाऊ शकतील.

दरम्यान, राज्यांनी लहान मुलांची शाळा सुरु कारण्याबाबद अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्याचबरोबर किशोरवयीन मुलांचे लसीकरण (Vaccination) मोठ्या प्रमाणात होत असल्याने यावेळी शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या वाढणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

हे देखील पहा -

या राज्यांमध्ये शाळा पूर्णपणे उघडल्या

पश्चिम बंगाल: येथे सोमवारपासून प्राथमिक आणि पूर्व प्राथमिक शाळा उघडण्यात आल्या आहेत. तर 3 फेब्रुवारीपासून इयत्ता 8 वी ते 12 वी साठी ऑफलाइन वर्ग सुरू केले होते.

महाराष्ट्र: येथे 24 जानेवारी रोजी शाळा पुन्हा सुरू झाल्या होत्या. मुंबई पॅरेंट्स असोसिएशनने बीएमसीला सर्व खाजगी शाळा ऑफलाइन पद्धतीने चालवण्याचे आवाहन केले होते.

आसाम: सरकारने 15 फेब्रुवारीपासून सर्व कोरोना निर्बंध मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. याठिकाणी 15 फेब्रुवारी पासून राज्यात शाळा पुन्हा सुरू होऊ शकतात, असे मानले जात आहे.

तेलंगणा: राज्यातील सर्व स्तरावरील वर्गांसाठी 1 फेब्रुवारीपासून ऑफलाइन शाळा सुरू करण्यात आल्या.

कर्नाटक: राज्यात 1 फेब्रुवारीपासून इयत्ता 1 ते 9 वी ऑफलाइन शाळा सुरू करण्यात आल्या.

पुडुचेरी: या केंद्रशासित प्रदेशातील शाळा ४ फेब्रुवारीपासून ऑफलाइन सुरू झाल्या आहेत.

या राज्यांमध्ये शाळा अंशतः उघडल्या आहेत

गुजरात: राज्य सरकारने सोमवारपासून इयत्ता 1 ते 9 वीच्या वर्गांसाठी ऑफलाइन शिक्षण सुरू केले, परंतु ऑनलाइन वर्ग देखील सुरू आहेत. विद्यार्थी यापैकी कोणताही पर्याय निवडू शकतात.

बिहार: सरकारने येथेही अंशत: निर्बंधांसह आठवीपर्यंतच्या शाळा उघडल्या आहेत. निम्म्या क्षमतेने शाळा सुरू केल्या जातील, तर त्यावरील वर्गांसाठी कोणतेही बंधन नसेल.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: मोठी बातमी! ठाकरेंचा दिग्गज नेता आणि नगरसेवकाविरोधात गुन्हा, राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra News Live Update: सोयाबीनचे बियाणे विक्री करणाऱ्या 'बूस्टर' कंपनीविरोधात अमरावतीत गुन्हा

SET Exam Update : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! SET परीक्षा पुढे ढकलली, नेमकं कारण काय? कधी होणार परीक्षा? वाचा A to Z अपडेट्स

Sindhudurg Tourism : मालदीव विसरा! महाराष्ट्रातच आहे 'हा' निसर्गरम्य समुद्रकिनारा, पावसाळ्यात दिसतं आरशासारखं निळेशार पाणी

Salman Khan : सलमान खानने विकले मुंबईतील आलिशान घर; किती कोटींमध्ये झाली डील, आकडा पाहून व्हाल चकित

SCROLL FOR NEXT