Yogi Adityanath Saam Tv
देश विदेश

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना मोठा दिलासा! SC म्हणाले, खटला चालणार नाही

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना सर्वोच्च न्यायालयाने हेट स्पीच प्रकरणी मोठा दिलासा दिला आहे.

साम वृत्तसंथा

नवी दिल्ली: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांना हेट स्पीच प्रकरणी सर्वाच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयाने मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्याविरोधात दाखल केलेली याचिक फेटाळली आहे. २००७ मध्ये योगी आदित्यनाथ यांच्यावरोधात हेट स्पीच प्रकरणी याचिका दाखल केली होती. या प्रकरणी न्यायलयाने म्हटले की, या याचिकेत योग्यता नाही, ज्याच्या आधारे योगी आदित्यनाथ यांच्यावर खटला चालवण्याची परवानगी दिली जाऊ शकते.

प्रक्षोभक भाषणाच्या आरोपाखाली मुख्यमंत्री योगी यांच्यावर खटला चालवण्यास सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी परवानगी नाकारली आहे. याअगोदर मे २०१७ मध्ये राज्य सरकारने हा खटला चालवण्यास परवानगी नाकारली होती. तेव्हा सरकारने सांगितले की, खटल्यातील पुरावे अपुरे आहेत. जे २०१८ मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयानेही कायम ठेवले होते.

सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी या प्रकरणावर सुनावणी करताना सांगितले की, या याचिकेत योग्यता नाही. त्यामुळे या प्रकरणाचा पाठपुरावा करण्यास परवानगी देता येणार नाही. खरे तर हे प्रकरण गोरखपूर दंगलीचे आहे. या प्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयाने सीएम योगींच्या (Yogi Adityanath) कथित भाषणाची चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली होती.

सीएम योगी आदित्यनाथ यांच्या वतीने मुकुल रोहतगी यांनी ही याचिका दंडासह फेटाळण्यात यावी, असा युक्तिवाद केला होता. दुसरीकडे, कपिल सिब्बल यांनी २००७ मधील गोरखपूर दंगल आणि योगींच्या वक्तव्यावरून झालेल्या वादात युक्तिवाद करण्यास नकार दिला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : मोठी बातमी! महाराष्ट्रातील ६४ नगरसेवकांवर कारवाई; ३ वर्षांसाठी अपात्र, कारण काय?

Maharashtra News Live Update: अमृत 2.0 योजनेअंतर्गत उल्हासनगरसाठी २११.०६ कोटींच्या स्वतंत्र पाणी योजनेला मंजुरी

Crime : बलात्कारपीडित १३ वर्षीय मुलीला न्याय हवा होता, ज्याच्याकडे मदत मागितली त्या वकिलानेही केले अत्याचार

Jana Nayagan: विजय थलापतींच्या 'जन नायकन'च्या रिलीजची तारीख ठरली; नवीन पोस्टर प्रदर्शित करत केली मोठी घोषणा

Bhandardara Tourism : छत्रीसारखा दिसणारा महाराष्ट्रातील 'हा' अनोखा धबधबा पाहिला का?

SCROLL FOR NEXT