Saudi crude oil tanker docks at Mumbai port amid tensions in the Strait of Hormuz. Saam Tv
देश विदेश

कच्च्या तेलाचं जहाज मुंबईत दाखल, तेलाची टंचाई कमी होणार?

Saudi Oil Shipment Arrives In Mumbai: सौदी अरेबियातून कच्च्या तेलाचं जहाज मुंबईत दाखल झालयं... त्यामुळे भारताच्या जहाजांना होर्मुझ ओलांडण्याची परवानगी देण्यात आलीय का? भारतावरील तेल संकट कमी होणार का? पाहूय़ात या स्पेशल रिपोर्टमधून...

Suprim Maskar

जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर असताना आणि इंधनासाठी जगात हाहाकार माजलेला असताना, भारतासाठी आजचा दिवस महत्त्वाचा ठरलाय...इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यातील भीषण युद्धामुळे जगाची 'लाईफलाईन' समजली जाणारी होर्मुझची सामुद्रधुनी सुरूंगांमुळे मृत्यूचा सापळा बनलीय..मात्र, यातून भारताचे कच्चे तेल घेऊन येणारे जहाज अखेर मुंबईत दाखल झालयं...कच्चं तेल वाहून आणणार हे जहाज भारतात येणं किती महत्त्वाचं आहे.. पाहूयात...

आखाती युद्धामुळे होर्मुझची सामुद्रधुनी जवळपास बंद झालीय. इराणने या मार्गावरून जाणाऱ्या काही जहाजांवर हल्ले केल्यानं आणि तशी धमकीही दिल्यानं बहुतेक तेल टँकर आणि व्यापारी जहाजांची वाहतूक पूर्णपणे थांबलीय.साहजिकच जगभरात इंधनाची टंचाई निर्माण झाली असून, पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये प्रचंड वाढ झालीय.. मात्र इराणनं भारताला होर्मुझ जलमार्गातून जहाज ओलांडण्यास परवानगी दिल्याचा दावा केला जात आहे... आता सौदी अरेबियातील रास तनुरा बंदरातून 1 लाख 35 हजार 335 टन कच्या तेलाची आयात करण्यात आलीयं...

आता मुंबईत शेनलॉंग् जहाज दाखल झाल्यानं भारतीय रिफायनरींना मोठा दिलासा मिळालाय.. हे कच्चे तेल आता माहुलमधील रिफायनरीकडे शुद्धीकरणासाठी पाठवण्यात येईल. मात्र जगासाठी होर्मुझ जलमार्ग बंद असताना झालेली ही तेल आयात भारताच्या मुत्सद्देगिरीचे आणि सागरी सुरक्षेचं मोठे यश मानलं जातयं...मात्र केवळ एक जहाज आल्यानं देशावरील इंधन टंचाईचं संकट कमी होणार का? हा खरा प्रश्न आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

इराणमध्ये अमिरेकन लढाऊ विमान कोसळलं, पायलटला पकडण्यासाठी बक्षीस केलं जाहीर, VIDEO

Fact Check: केंद्र सरकारची वर्क फ्रॉम होम योजना? महिलांना 25 हजार मानधन मिळणार?

Ashok Kharat: मुलानेच उघड केलं खरातचं हवाला कांड? चौकशीदरम्यान SIT ला सांगितली धक्कादायक माहिती

अवकाळी पावसाने वाजवले स्मार्ट सिटीचे तीनतेरा; स्मार्ट सिटी की 'नरक' सिटी, पुणेकरांचा संताप

Earthquake: दिल्लीसह उत्तर भारत भूकंपाच्या धक्क्याने हादरला, नागरिक घाबरून घराबाहेर पळाले; VIDEO समोर

SCROLL FOR NEXT