Major Arrests in Delhi Water Board Scam Satyendar Jain Among Six Held saam tv
देश विदेश

Delhi : दिल्लीतील दिग्गज नेत्यासह ६ जणांना अटक; माजी CEO आणि IAS अधिकाऱ्याचाही समावेश, एसीबीची सर्वात मोठी कारवाई

Satyendar Jain Arrested in Delhi Water Board Corruption Case : दिल्लीच्या जल बोर्डाच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाशी संबंधित कथित भ्रष्टाचार प्रकरणात माजी मंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते सत्येंद्र कुमार जैन यांच्यासह सहा जणांना अटक करण्यात आली आहे. दिल्ली सरकारच्या एसीबीने ही कारवाई केली आहे.

Nandkumar Joshi

दिल्ली जल बोर्डाच्या (DJB) सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाशी संबंधित कथित भ्रष्टाचार प्रकरणात आम आदमी पक्षाचे नेते आणि माजी मंत्री सत्येंद्र कुमार जैन यांच्यासह ६ जणांना अटक करण्यात आली आहे. दिल्ली सरकारच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) ही कारवाई केली आहे. सत्येंद्र जैन यांच्यासह अटक केलेल्यांमध्ये दिल्ली जल बोर्डाचे माजी सीईओ आणि आयएएस अधिकारी उदित प्रकाश राय, बोर्डाचे माजी सल्लागार अंकित श्रीवास्तव आणि इतर तिघांचा समावेश आहे.

माजी सीईओवर दीड कोटींची लाच घेतल्याचा आरोप

दिल्ली जल बोर्डाचे तत्कालीन सीईओ उदित प्रकाश राय यांच्यावरील गंभीर आरोपांशी संबंधित मुद्दा आहे. तपास यंत्रणेच्या म्हणण्यानुसार, राय यांनी कथितरित्या स्वतःच्या आणि नातेवाईकांच्या बँक खात्याद्वारे एकूण १.५२ कोटी रुपयांची लाच स्वीकारली होती. ही रक्कम एका कंपनीच्या माध्यमातून पाठवण्यात आली होती.

टेंडरमधील शर्तींमध्ये फेरफार केल्याचा आरोप

एसीबीच्या माहितीनुसार, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या निविदा तयार करण्याच्या प्रक्रियेत तांत्रिक शर्ती आणि अटींचा समावेश केला होता. त्यामुळे टेंडर मिळवण्यासाठी होणाऱ्या संभाव्य स्पर्धेलाच मर्यादा आली. परिणामी एक विशेष तंत्रज्ञान उपयोगात आणणाऱ्यांनाच त्याचा लाभ मिळेल अशी परिस्थिती निर्माण झाली. पायलट प्रोजेक्टच्या अंतर्गत कुठलाही अभ्यास करण्यात आला नव्हता, असाही आरोप आहे. अटी आणि शर्तींमध्ये फेरफार झाल्यामुळे पूर्ण निविदा प्रक्रिया प्रभावित झाल्याचे तपास यंत्रणेचे म्हणणे आहे.

सत्येंद्र जैन यांच्यासह अटकेची कारवाई झालेले इतर कोण?

या प्रकरणात एसीबीने माजी मंत्री सत्येंद्र कुमार जैन, जल बोर्डाचे माजी सीईओ उदित प्रकाश राय, माजी सल्लागार अंकित श्रीवास्तव, नागेंद्र यादव, राजा कुमार कुर्रा आणि पंकज वर्मा यांना अटक केली आहे. या प्रकरणाच्या तपासात आढळलेल्या माहितीच्या आधारे सहा संशयित आरोपींची चौकशी करण्यात आली आणि १८ ऑगस्टला त्यांना अटक करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime: साधूच्या वेशात सोन्याची लूट, भुरळ पाडून लाखोंचे दागिने लंपास; VIDEO व्हायरल

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Politics: ठाकरेसेनेचे नगरसेवक बाद करण्याचा डाव? शिंदेसेनेचा मोठा डाव!

Manoj Jarange: मनोज जरांगेंना हल्ल्याची भीती, शिंदेसेनेचे 2 मंत्री आणि 2 प्रवक्यांवर खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT