Madras High Court Saam Tv
देश विदेश

Sanatan Remarks Row: 'अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अर्थ द्वेषपूर्ण भाषण देणं नाही', सनातनच्या वादावर मद्रास उच्च न्यायालयाचे भाष्य

Madras HC On Sanatan Remarks Row: 'अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अर्थ द्वेषपूर्ण भाषण देणं नाही', सनातनच्या वादावर मद्रास उच्च न्यायालयाचे भाष्य

Satish Kengar

Madras HC On Sanatan Remarks Row:

सनातन धर्माबाबत डीएमके नेते उदयनिधी स्टॅलिन यांनी केलेल्या वक्तव्याचा वाद अद्यापही सुरूच आहे. आता मद्रास उच्च न्यायालयाचेही याप्रकरणी महत्त्वाची टिप्पणी केली आहे.

अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अर्थ द्वेषपूर्ण भाषण देणे नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. धर्माशी संबंधित बाबींमध्ये जेव्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर केला जातो, तेव्हा कोणीही दुखावला जाणार नाही. याची काळजी घेणे आवश्यक आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे.

न्यायालयाने काय म्हटले?

याप्रकरणी सुनावणीदरम्यान मद्रास उच्च न्यायालयाने म्हटले आहे, "जेव्हा धर्माशी संबंधित बाबींमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर केला जातो, तेव्हा कोणीही दुखावला जाणार नाही, याची खात्री करणे आवश्यक आहे. दुसऱ्या शब्दांत, भाषण स्वातंत्र्य म्हणजे द्वेषयुक्त भाषण देणे नाही. भाषण देणार्याने या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नये.'' (Latest Marathi News)

न्यायालयाने सांगितला सनातन धर्माचा अर्थ

न्यायालयाने म्हटले की, सनातन धर्म सामान्यतः 'शाश्वत कर्तव्यांचा' समूह समजला जातो आणि विशिष्ट साहित्यात त्याचा शोध लावता येत नाही. न्यायालयाने म्हटले, "यामध्ये राष्ट्र, राजा, राजाने प्रजेप्रती असलेली कर्तव्ये, आई-वडील, गुरू आणि गरिबांची काळजी यांचा समावेश होतो. सनातन धर्माला विरोध करणे म्हणजे ही सर्व कर्तव्ये नष्ट करणे, असं होईल. एका नागरिकाने आपल्या देशावर प्रेम करू नये का?''

काय आहे प्रकरण?

दरम्यान, तमिळनाडूतील तिरुवरूर येथील सरकारी कला महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी माजी मुख्यमंत्री अन्नादुराई यांच्या जयंतीनिमित्त नोटीस जारी केली होती. यामध्ये त्यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ‘सनातनला विरोध’ या विषयावर आपले विचार मांडण्याचे आवाहन केले होते. या नोटिशीच्या विरोधात मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती, त्यावर सुनावणी करताना न्यायमूर्ती एन शेषशायी यांनी ही टिप्पणी केली.

द्रमुक नेते उदयनिधी यांच्या वक्तव्यानंतर सनातन धर्माचा वाद सुरू झाला. ते म्हणाले होते, "आम्ही डेंग्यू, डास, मलेरिया किंवा कोरोनाव्हायरसला विरोध करू शकत नाही. त्यांना संपवायचे आहे. त्याचप्रमाणे सनातन धर्मालाही संपवायचे आहे." यानंतर द्रमुकच्या अन्य नेत्यांनीही सनातन धर्मावर वादग्रस्त टीका केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway : मोठी बातमी! पुण्याहून मुंबईला येणार्‍या सर्व एसटी बसेस रद्द, २१ तासांपासून एक्सप्रेस वे ठप्प, प्रवास टाळाच, कारण...

मी जातपात मानत नाही, माळी समाजाचा उल्लेख; अजितदादांनी मृत्यूआधी कॉलवर नाव घेतलेल्या नेत्याने सगळं काही सांगितलं

लोकसभेच्या गेटवर राडा! बघा गद्दार चालले; काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या मंत्र्याला राहुल गांधींनी डिवचले, मंत्री म्हणाले...,

Yoga Poses For Thyroid Problem: थायरॉईडवर सोपा उपाय, रोज घरीच करा ही 5 योगासने

Eyebrow Growth: केमिकल प्रॉडक्ट्स विसरा! दाट आणि सुंदर भुवयांसाठी करा हे 5 घरगुती उपाय

SCROLL FOR NEXT