Viral Video  Saam Tv
देश विदेश

Viral Video : सोनी दे नखरे...गाण्यावर आफ्रीकन मुलांचा जबरदस्त डान्स; व्हिडिओ पाहून तुमचेही पाय थिरकतील

युगांडामध्ये देखील विद्यांर्थ्यांनी या गाण्यावर अफलातून डान्स केला आहे.

साम टिव्ही ब्युरो

Viral Video : सोशल मीडियावर नेहमीच अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. बॉलिवूडच्या गाण्यांवर विविध रील्स व्हिडिओ तुम्ही आजवर पाहिले असतील. यात काही परदेशी व्यक्तींनीही बॉलिवूड सॉंग्सवर रील्स केले आहेत. अशात असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यात काही मुलांनी एकत्र वाखाणण्याजोगा डान्स केला आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये शाळेतील विद्यार्थांचा एक ग्रुप गोविंदा आणि सलमानच्या एका गाण्यावर डान्स करत आहे. सोनी दे नखरे हे गाण नेहमीच अनेकांच्या आवडीच राहीलं आहे. आजही हे गाणं कानी पडलं की, लगेचच यावर पाय थिरकू लागतात. अशात युगांडामध्ये देखील विद्यांर्थ्यांनी या गाण्यावर अफलातून डान्स केला आहे.

या ग्रूपमध्ये काही मुली देखील आहेत. या सर्वांनी सोनी दे नखरे या गाण्यावर जबरदस्त डान्स स्टेप्स केल्या आहेत. त्यांचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. युजर्सनी त्यांच्या व्हिडिओवर कमेंट्समधून कौतूकाचा वर्षाव केला आहे. या मुलांच्या डान्स (Dance) स्टेप्स पाहून तुम्हाला देखील सोनी दे नखरे गाण्यावर नाचावे वाटेल.

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ ghettokids_tfug या इंस्टाग्राम (Instagram) अकाउंटवर शेअस करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला. खूप कमी वेळात या व्हिडिओला ४.४ दशलक्षांहून अधिक व्ह्यूव्ज मिळाले आहेत. तसेच मुलांचा भन्नाट डान्स पाहून नेटकऱ्यांनी त्यांच्या डांन्सचे कमेंट बॉक्समध्ये विशेष कौतूक केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Meta Microsoft Layoff: मोठी बातमी! मायक्रोसॉफ्ट अन् मेटा २३,००० कर्मचाऱ्यांना नारळ देणार? कंपनी महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत

Mumbai Drug Party: नेस्को ड्रग्ज पार्टी प्रकरणात मोठी कारवाई, बॉलिवूड अभिनेत्रीला अटक

Priyadarshini Indalkar Photos: 'अगं तुझ्या एका नजरेने जीव झाला वेडापिसा' प्रियदर्शनीचे स्टायलिश फोटोशूट

Lawrence of Punjab: 'लॉरेन्स ऑफ पंजाब' वादाच्या भोवऱ्यात; रिलीजआधीच बंदीची मागणी; नेमकं कारण काय?

Maharashtra News Live Update: पुण्यात भाजपच्या महिला मोर्चाचे काँग्रेस पक्षाविरोधात आंदोलन

SCROLL FOR NEXT