Sakal Media Global Realty Expo at Abudhabi saam TV marathi News
देश विदेश

Global Realty Expo : महाराष्ट्राची माती अबुधाबीत चमकली, सकाळच्या ग्लोबल रिअल्टी एक्स्पोने इतिहास रचला

Sakal Media Global Realty Expo in Abu Dhabi : अबूधाबीतील रॉयल रोज हॉटेलमध्ये झालेल्या ‘सकाळ मीडिया ग्लोबल रिअल्टी एक्स्पो’ला एनआरआय गुंतवणूकदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.

Namdeo Kumbhar

  • सकाळ मीडिया ग्लोबल रिअल्टी एक्स्पो भव्य पद्धतीने पार पडला.

  • पुण्यातील निवडक प्रकल्पांच्या प्रेझेंटेशनला एनआरआय गुंतवणूकदारांनी मोठा प्रतिसाद दिला.

  • प्रदर्शनात महाराष्ट्रीयन संस्कृती –संगीत, खाद्यपदार्थ आणि सजावटीचा विशेष अनुभव आला.

  • गोल्ड कॉइन लकी ड्रॉच्या विजेत्याचा सन्मान करण्यात आला.

Sakal Media Global Realty Expo at Abudhabi : पुण्यातील बांधकाम क्षेत्र जागतिक गुंतवणूकदारांसाठी आणखी जवळ येणार आहे. 'सकाळ'च्या पुढाकारातून अबूधाबीमध्ये 'सकाळ ग्लोबल रिअल्टी एक्स्पो'चे आयोजन करण्यात आले. अबूधाबीतील 'हॉटेल रॉयल रोझ' या अत्याधुनिक स्थळी हा एक्स्पो भरविण्यात आला. एनआरआय गुंतवणूकदार आणि बांधकाम क्षेत्रात रस असलेल्यांसाठी हा एक विशेष सोहळा ठरलाय. पुण्यातील निवडक आणि प्रतिष्ठित प्रकल्पांचे भव्य आंतरराष्ट्रीय प्रदर्शन २२ आणि २३ नोव्हेंबर रोजी झाले. अबूधाबी येथे सुरू असलेल्या या भव्य प्रदर्शनात गोल्ड कॉइनचा लकी ड्रॉ होऊन विजेता झाला.

सकाळ मीडियामुळे महाराष्ट्राच्या मातीची चमक दिसली. अबुधाबीतील भव्य रॉयल रोज हॉटेलमध्ये सकाळ मीडिया ग्लोबल रीअल्टी एक्स्पोला चांगला प्रतिसाद मिळाला. यामध्ये महाराष्ट्राची संस्कृतीने लक्ष वेधले. पुण्यातील प्रतिष्ठित रिअल इस्टेट प्रकल्पांचे आकर्षक प्रदर्शन, महाराष्ट्रीयन संस्कृतीचे दर्शन आणि गोल्ड कॉइन लकी ड्रॉने संपूर्ण कार्यक्रम लक्षवेधी ठरला.

Sakal Global Realty Expo

या एक्स्पोमध्ये गोल्ड कॉइन लकी ड्रॉ काढण्यात आला आणि त्यात भाग्यवान विजेते ठरले. महाराष्ट्रीयन संस्कृती, खाद्यपदार्थ, संगीत आणि पारंपरिक सजावटीने सजलेल्या या प्रदर्शनात भारतातील नामांकित रिअल इस्टेट डेव्हलपर्सनी उपस्थिती दर्शवली होती.

Sakal Global Realty Expo

महाराष्ट्राच्या बाहेर विदेशात स्थायिक झालेल्या महाराष्ट्रीयन बांधवांसाठी ग्लोबल रीअल्टी एक्स्पो ही एक चांगली संधी आहे. या एक्स्पोचे वैशिष्ट्य म्हणजे गोल्ड कॉइन लकी ड्रॉ होय. पहिल्या दिवशीच्या ड्रॉमध्ये सोन्याचे नाणे जिंकणाऱ्या भाग्यवान विजेत्यांचे आयोजकांनी अभिनंदन केले. सकाळ मीडिया ग्रुपच्या या आंतरराष्ट्रीय उपक्रमाला अबुधाबीतील महाराष्ट्रीयन लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

Sakal Global Realty Expo

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री मैदानात

Mughal harem: मुघल हरममधून पळून जाणाऱ्या महिलांसोबत काय केलं जायचं?

घरी परतताना शिक्षकावर हल्ला, २ हल्लेखोरांनी डोक्यात गोळी घातली; पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड

Kriti Sanon: तेरे इश्क में हर रंग लाल...; क्रिती सॅननचा रॉयल लूक व्हायरल, पाहा PHOTO

Accident News : संभाजीनगरमध्ये भीषण अपघात, ब्रिजवर अचानक ब्रेक मारला, ३-४ वाहने धडकली, ५ वर्षाच्या मुलाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT