Shocking Video Saam Tv
देश विदेश

Shocking Video: धक्कादायक! काही क्षणात गव्हाची पोती कामगारांच्या अंगावर पडली; अंगाचा थरकाप उडवणारी घटना CCTV त कैद

Tanvi Pol

व्यक्तीच्या सुरक्षितेसाठी सीसीटीव्हीचा वापर करण्यात येत आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातून घडलेल्या घटनांचे फुटेज पाहण्यास मिळतात. जर सीसीटीव्ही वापर करण्यात आला नसता तर अनेक थरारक अपघात आपल्याला पाहण्यास मिळाले नसते. सोशल मीडियावरही सध्या अशाच एका धक्कादायक अपघाताचा सीसीटीव्ही फुटेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यात एका गोडाउनमध्ये काम करत असताना कामगारांवर धान्याची पोती मोठ्या संख्येने अंगावर कोसळली आहेत. सध्या या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल होत आहे.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओ काही मजूर काम करताना दिसून येत आहे. त्यांच्या आजूबाजूला थरावरथर मांडलेली पोती दिसत आहेत. अशातच व्हिडिओत काही मजूर ज्या पोत्यांच्या बाजूला आहेत. मात्र क्षणार्धात सर्व जड पोती त्या मजूरांच्या अंगावर पडतात. सर्व मजूर त्या पोत्यांच्या खाली अडकलेली दिसून येत आहेत. सर्व घटना त्या गोडाउनमध्ये असलेल्या सीसीटीव्हीमध्ये (CCTV) कैद झालेली आहे.

व्हायरल होत असलेली घटना गुजरात राज्यातील असल्याचे समजून येत आहे. कामगारांचा व्हिडिओ सोशल मीडिया एक्स प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असून सध्या नेटकरी वर्गाच चर्चेचा विषय ठरलेला आहे. एक्स प्लॅटफॉर्म व्हिडिओ साधारण ११ सप्टेंबर रोजी पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ व्हायरल होताच मोठ्या संख्येने व्हिडिओला व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत. शिवाय अनेक आश्चर्यजनक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shiv Sena Dasara Melava: विधानसभेपूर्वी CM शिंदेंची कसोटी? 50 आमदार निवडून आणण्याचे आव्हान; मेळाव्यात शिंदें काय बोलणार?

ST Fare: ऐन दिवाळीच्या तोंडावर प्रवाशांच्या खिशाला कात्री, ST चा प्रवास महागणार

Maharashtra News Live Updates :पुण्यात शहरातील अनेक भागात पावसाची हजेरी

Job Recruitment: नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेडमध्ये Non-Executiveपदांसाठी भरती; 'या' तारखेपूर्वी करा अर्ज

Maharashtra Politics : दसरा मेळाव्याआधीच मुंबईत राजकीय वातावरण तापलं; बॅनर फाडल्याने ठाकरे गट आक्रमक

SCROLL FOR NEXT