russia ukraine war Ukrainian nuclear power plant roof /Social Media SAAM TV
देश विदेश

आशियातील सर्वात मोठ्या न्यूक्लिअर प्लांटवर क्षेपणास्त्र हल्ला; सॅटेलाइट फोटोंमुळं घटना उघड

आशियातील या सर्वात मोठ्या न्यूक्लिअर प्लांटवर क्षेपणास्त्र हल्ला झाल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.

Nandkumar Joshi

Russia-Ukraine War | नवी दिल्ली: युक्रेनमधील रशियाचं कंट्रोल असलेलं जापोरिज्जिया अणुऊर्जा संयंत्राचे सॅटेलाइट फोटो समोर आले आहेत. त्यात आशियातील या सर्वात मोठ्या न्यूक्लिअर प्लांटवर क्षेपणास्त्र हल्ला झाल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. न्यूक्लिअर रिएक्टरच्या काही मीटरवरील फ्लुएल स्टोरच्या बिल्डिंगच्या छतावर क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे तयार झालेले भगदाड दिसून येत आहेत. त्यामुळे हल्ला झाल्याने स्पष्ट होत आहे.

रशियन अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, युक्रेनच्या (Russia- Ukraine War) क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे फ्युएल टँकच्या छताचे मोठे नुकसान झाले आहे. जर न्यूक्लिअर प्लांटवर थेट हल्ला झाला असता तर, सर्वात मोठी हानी होण्याची शक्यता होती.

रशिया आणि युक्रेन (Ukraine) यांच्यात गेल्या चार महिन्यांपासून युद्ध सुरू आहे. त्याच दरम्यान अनेकदा रशियाच्या नियंत्रणाखालील जापोरिज्जिया अणुऊर्जा संयंत्राच्या जवळपास हल्ले झालेले आहेत. यानंतर दोन्ही देशांकडून परस्परांवर आरोप केले जात आहेत. जापोरिज्जिया हा आशियातील सर्वात मोठा अणुऊर्जा प्लांट आहे. सध्या तो रशियाच्या ताब्यात आहे. विशेष म्हणजे हे संयंत्र युक्रेनचे कर्मचारी चालवत आहेत.

दुसरीकडे, आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीचे (IAE) चे महासंचालक राफेल ग्रोसी यांनी आंतरराष्ट्रीय अणु निरीक्षकांच्या दलातील जापोरिज्जिया अणुऊर्जा संयंत्राला भेट देण्यापूर्वी युक्रेनमध्ये त्यांच्या तयारीचा आढावा घेतला. आयएईच्या विशेषज्ज्ञांचे एक पथक युक्रेनच्या जापोरिज्जिया अणुऊर्जा संयंत्राला भेट देणार आहेत. तेथे गळती झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

राफेल ग्रोसी यांनी सांगितले की, युरोपातील सर्वात मोठ्या अणुऊर्जा संयंत्राच्या देखरेखीसाठी युक्रेनमध्ये एक स्थायी मिशन स्थापन करणे अपेक्षित आहे. ग्रोसी यांनी यावेळी देखरेख करणारे मिशन पथक रवाना होण्यापूर्वी परिस्थितीचा आढावा घेतला.

ही खूपच कठीण मोहीम आहे. आम्ही युद्धाच्या क्षेत्रात जात आहोत. ज्या परिसरावर ताबा घेतलेला आहे, तेथे भेट दिली जात आहे. त्यासाठी केवळ रशियाचीच नव्हे तर, युक्रेनच्या स्पष्ट हमीची आवश्यकता आहे. आम्ही त्यांच्याकडून हमी घेतलेली आहे. त्यामुळे आम्ही आता पुढे जात आहोत, असे ग्रोसी म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Car Price Drop: GST कमी झाल्यावर ७५,००० रुपयांनी स्वस्त झाली टाटाची कार, आता किंमत किती?

डेंग्यूच्या आजाराचा डास कसा ओळखाल?

वेताळवाडी किल्ल्यावर टोळक्यांची हुल्लडबाजी, पंचधातूची तोफ कोसळली, एक जण जखमी

Kiku Sharda: मी नेहमी शोसोबत...; द ग्रेट इंडियन कपिल शो सोडण्याबाबत किकू शारदाने व्यक्त केल्या भावना, म्हणाला...

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

SCROLL FOR NEXT