Russo Ukrainian War LIVE: 'रशियाचे 4,300 सैनिक मारले; युक्रेनचा संयुक्त राष्ट्रात दावा...(पहा Video) SAAM TV
देश विदेश

Russo Ukrainian War LIVE: 'रशियाचे 4,300 सैनिक मारले; युक्रेनचा संयुक्त राष्ट्रात दावा...(पहा Video)

रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये चांगलेच युद्ध सुरू आहे. रशियन सैन्य केलेल्या आक्रमणाला युक्रेनच्या सैन्याकडून जोरदार प्रतिकार होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था: रशिया (Russia) आणि युक्रेन यांच्यामध्ये चांगलेच युद्ध सुरू आहे. रशियन सैन्य केलेल्या आक्रमणाला युक्रेनच्या (Ukraine) सैन्याकडून जोरदार प्रतिकार होत आहे. या युद्धामध्ये रशियाचे ४३०० पेक्षा जास्त सैन्य ठार झाले असल्याचा दावा युक्रेनने केला आहे. तर, युक्रेनच्या सैनिकांनी २०० रशियन सैनिकांना युद्धबंदी केले असल्याचे सांगितले जात आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेमध्ये युक्रेन ही माहिती दिली आहे. युक्रेनने सांगितले आहे की, रशियाचे ४३०० सैनिक ठार झाले आहेत.

पहा व्हिडिओ-

या य़ुद्धामध्ये आतापर्यंत रशियाचे (Russia) १४६ रणगाडे, २७ विमान आणि २६ हेलिकॉप्टर (Helicopter) पाडले असल्याचे युक्रेनने यावेळी सांगितले आहे. युक्रेनने रशियन सैनिकांच्या नातेवाईकासाठी एक हेल्पलाइन सुरू केली होती. यामध्ये त्यांच्याशी संपर्क साधता येणार आहे. १ तासामध्ये जवळपास १०० पेक्षा जास्त सैनिकांच्या आई- वडिलांकडून फोन आले होते, अशी माहिती युक्रेनने दिली होती. रशियाने युक्रेनने केलेले सर्व दावे फेटाळून लावले आहेत.

रशियाच्या हल्ल्यामध्ये आतापर्यंत ११६ लहान मुलांसह १६८४ नागरीक जखमी झाले असल्याचे युक्रेनने सांगितले आहे. मात्र, किती सैनिकांना प्राण गमवावे लागले, याविषयी युक्रेन सरकारने आतापर्यंत कोणतीही माहिती दिली नाही. संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेने संयुक्त राष्ट्राच्या आमसभेमध्ये १ आपात्कालीन विशेष सत्र बोलवण्याचा निर्णय घेतला आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेमध्ये याविषयीच्या प्रस्तावाच्या बाजूने ११ मते पडली होती.

रशियानेच याच्या विरोधामध्ये मतदान केले होते. भारत, चीन आणि संयुक्त अरब अमिरातीने या मतदानामध्ये सहभाग घेतला नाही. आज सकाळी ही बैठक होणार आहे. संयुक्त राष्ट्र संघात १९५० पासून आतापर्यंत १० विशेष आपात्कालीन सत्र बोलावण्यात आले होते. सोमवारी होणार ही बैठक ११ वी बैठक राहणार आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: उल्हासनगरमध्ये पाण्याचा महापूर, फुटलेल्या पाइपलाईनमधून लाखो लिटर पाणी वाया

Hair Care: केसगळती कमी करायची आहे? मग 'हे' घरी बनवलेलं हेअर वॉटर अंघोळी केल्यानंतर १ स्प्रे करा

मराठवाड्यात 500 च्या नोटांचा तुटवडा; तुळजापूरमध्ये व्यापाऱ्यांना फटका

प्रशासनात मोठे फेरबदल! मुख्यमंत्री ॲक्शन मोडमध्ये; १६ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या

Monsoon 2026: मोठी बातमी! वेळेआधीच मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार, हवामान खात्याने तारीख सांगितली

SCROLL FOR NEXT