Retail Inflation News Update In Marathi (File Photo) SAAM TV
देश विदेश

Inflation: महागाईची लाट ओसरली; एप्रिलच्या तुलनेत किरकोळ महागाई दरात घट

महागाईचे चटके सोसलेल्या सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवी दिल्ली: महागाईमुळे होरपळ झालेल्या सर्वसामान्यांना काहीसा दिलासा देणारे वृत्त आहे. मे २०२२ मध्ये किरकोळ महागाई (Retail Inflation) दरात घट नोंदवलेली आहे. मे २०२२ मध्ये किरकोळ महागाई दर ७.०४ टक्के इतका आहे. एप्रिलमध्ये हा दर ७.७९ टक्के इतका होता.

किरकोळ महागाई दरात घट होण्यामागे तेलावरील एक्साइज ड्युटीत कपात हे प्रमुख कारण असल्याचे बोलले जाते. मात्र, तेलाच्या वाढत्या किंमती आणि रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर पुरवठा साखळीत आलेल्या अडथळ्यांमुळे आगामी काही दिवसांत महागाई वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नॅशनल स्टॅटिकल ऑफिस अर्थात एनएसओने सोमवारी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, एप्रिलमध्ये ग्राहक किंमत निर्देशांक आधारित (CPI) महागाई दर ७.७९ टक्के इतका होता. गेल्या वर्षी मे मध्ये किरकोळ महागाई दर ६.३ टक्के होता.

रिझर्व्ह बँकेने (RBI) या महिन्यात पतधोरण जाहीर करताना चालू आर्थिक वर्षासाठी महागाईचा अंदाज ५.७ टक्क्यांवरून वाढवत ६.७ टक्के केला आहे. रिझर्व्ह बँकेकडून पतधोरणावर विचार करताना प्रामुख्याने किरकोळ महागाईवर लक्ष दिले जाते. मे महिन्यात खाण्यापिण्याच्या वस्तूंच्या महागाईचा दर हा ७.९७ टक्के होता. तर एप्रिलमध्ये हाच दर ८.३१ इतका होता. दुसरीकडे, शहरी भागात हाच दर मे महिन्यात वाढलेला दिसून आला. तर एप्रिलमध्ये शहरी भागात हाच दर ८.०९ टक्के होता. तो मे महिन्यात वाढून ८.२० टक्के झाला.

३६ दिवसांच्या आत दुसऱ्यांदा रेपो रेटमध्ये वाढ

रिझर्व्ह बँकेने महागाई नियंत्रणात आणण्यासाठी व्याजदारांमध्ये जवळपास १ टक्का वाढ केली. अवघ्या ३६ दिवसांच्या आत आरबीआयने दुसऱ्यांदा रेपो रेटमध्ये वाढ केली. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी ८ जून रोचजी रेपो रेटमध्ये ५० बेसिस पॉइंट्सने वाढ करताना ४.४० टक्क्यांवरून वाढवून ४.९० टक्के इतका केला होता. यापूर्वी ४ मे रोजी रेपो रेटमध्ये ४० बेसिस पॉइंटची वाढ केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यातील निंभोरा स्टेशनवर रेल्वे २ तासांपासून खोळंबल्या

Silver Jodavi Design: वटपौर्णिमेसाठी खरेदी करा खास या ७ नव्य डिझाइन्सची सिल्व्हर जोडवी

आयुक्त तुकाराम मुंढेंची नागपूरनंतर धुळ्यातही मोठी कारवाई; २३ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

पुण्यातील काँग्रेसच्या दिग्गज नेत्याचे निधन; राजकीय वर्तुळात शोककळा

Forts Near Shivneri : शिवनेरी किल्ला पाहायला गेलाय? मग जुन्नरच्या डोंगररांगांतील 'या' ५ गड-किल्ल्यांना नक्की भेट द्या

SCROLL FOR NEXT