खाद्यतेल्याच्या साठेबाजीवर केंद्र सरकारकडून निर्बंध; या काळात तेलाचे भाव होतील कमी? Saam Tv
देश विदेश

खाद्यतेल्याच्या साठेबाजीवर केंद्र सरकारकडून निर्बंध; या काळात तेलाचे भाव होतील कमी?

पेट्रोल आणि डिझेल भाववाढीने सामान्य नागरिक त्रस्त असतानाच आता परत खाद्य तेलाच्या वाढत्या भावामुळे सामान्यांचे कंबरडे चांगलेच मोडले

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेल भाववाढीने सामान्य नागरिक त्रस्त असतानाच आता परत खाद्य तेलाच्या वाढत्या भावामुळे सामान्यांचे कंबरडे चांगलेच मोडले आहे. तेलाच्या वाढत्या भावामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे.

हे देखील पहा-

खाद्यतेलांचे गगनाला भिडलेले भाव हे आटोक्यात आणण्याकरिता सरकारने देशांतर्गत बाजारात खाद्यतेल व्यापाऱ्यांना ३१ मार्च २०२२ पर्यंत तेलाचा साठा करण्यावर मर्यादा आणली आहे. यामुळे सणासुदीच्या दिवसात खाद्यतेलाची साठेबाजी करणाऱ्यांवर वचक बसणार आहे. मागील एका महिन्याच्या कालावधीत खाद्य तेलाचे भाव २० टक्क्यांपर्यंत वाढल्याचे दिसून आले आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये वाढलेल्या भाव या देशातील खाद्य तेलाच्या भाव वाढण्यास कारणीभूत असल्याचे भारतीय उद्योग मंडळाने यावेळी सांगितले होते. पेट्रोल आणि डिझेल भाववाढीने सामान्य नागरिक मोठ्या प्रमाणात वैतागले आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT