Rbi News  saam tv
देश विदेश

RBI Penalty on Banks: रिझर्व्ह बँकेची ५ सहकारी बँकांवर मोठी कारवाई; ठोठावला लाखोंचा दंड

भारतीय रिझर्व्ह बँकने पाच सहकारी बँकांनी निर्देशांचे पालन न केल्यामुळे त्या बँकावर दंडात्मक कारवाई केली आहे.

Vishal Gangurde

नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ही ग्राहकांचं हित लक्षात घेऊन बँकेच्या कामकाजावर बारकाईने नजर ठेवते. भारतीय रिझर्व्ह बँक ही बँकेकडून निर्देशांचे पालन नाही केलं तर कारवाई देखील करते. नुकतंच भारतीय रिझर्व्ह बँकने पाच सहकारी बँकांनी निर्देशांचे पालन न केल्यामुळे त्या बँकावर दंडात्मक कारवाई केली आहे. या सहकारी बँकेत ठाणे भारत सहकारी बँकेचा देखील सामावेश आहे. (RBI Penalty On Banks)

भारतीय रिझर्व्ह बँकेने 'कर्नाटक राज्य सहकारी एपेक्स बँक लिमिटेड'वर हाऊसिंग फायनान्सच्या निर्देशांचे पालन न केल्यामुळे २५ लाखांचा दंड ठोठावला आहे, असे निवेदनात म्हटले आहे. याआधी देखील आरबीआईने निर्देशांचे पालन न केल्यामुळे आठ सहकारी बँकावर दंडात्मक कारवाई केली होती.

ठाणे भारत सहकारी बँक लिमिटेडवर ठोठावला १५ लाखांचा दंड

भारतीय रिझर्व्ह बँकेने एका निवदेनात म्हटले आहे की, 'ठाणे भारत सहकारी बँक लिमिटेड' बँकेला आरबीआयने १५ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. अनधिकृत इलेक्ट्रॉनिक बँकिंग व्यवहारात ग्राहकांच्या हिताबाबत वेळीच लक्ष न दिल्यामुळे रिझर्व्ह बँकेने कारवाई केली आहे.

राणी लक्ष्मीबाई अर्बन को-ऑपरेटिव बँकेला ठोठावला ५ लाखांचा दंड

राणी लक्ष्मीबाई अर्बन को-ऑपरेटिव बँक, झांसी या बँकेला ५ लाखांचा दंड ठोठावला आहे. 'सुपरवायजरी अॅक्शन फ्रेमवर्क एसएएफ'च्या निर्देशांचे पालन न केल्यामुळे सदर कारवाई करण्यात आली आहे.

निकोलनस कॉ-ऑपरेटिव्ह टाउन बँकेला २ लाखांचा दंड

एक्सपोजर नियम आणि वैधानिक, UCB अंतर्गत इतर निर्बंधाअंतर्गत जारी केलेल्या निर्देशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी निकोलनस कॉ-ऑपरेटिव्ह टाउन बँक, तंजावुर जिल्हा, तमिळनाडू सदर बँकेवर आयबीआयने २ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

शहरी सहकारी बँक राउरकेला बँकेला १० हजारांचा दंड

शिक्षण आणि जागरूकता निधीशी संबंधित नियामांचे उल्लंघन केल्याप्रकरणी शहरी सहकारी बँक, राउरकेला येथील बँकेवर १० हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. रिझर्व्ह बँकेने नियामक अनुपालनातील त्रुटींबद्दल दंड आकारला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Urine Infection : पुन्हा पुन्हा युरिन इन्फेक्शन होतंय? महिलांनो! जाणून घ्या नेमकं कारण अन् टाळा 'या' चुका

Maharashtra News Live Update: OBCच्या हक्काला धक्का नाही – उदय सामंत

Kitchen Hacks : लाकडी चॉपिंग बोर्ड धुतल्यानंतरही दुर्गंधी येतेय? या घरगुती उपायांनी करा डीप क्लीन

Weight Loss : लाइफस्टाइलमध्ये करा 'हे' ३ बदल; फक्त ३० दिवसांत वजन होईल कमी अन् दिसाल सडपातळ

8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

SCROLL FOR NEXT