Jio Recharge Plan Saam Tv
देश विदेश

Jio Recharge Plan: जिओचा सर्वात स्वस्त प्रीपेड प्लॅन; अनलिमिटेड कॉलिंगसह दिवसाला 2GB डेटा, जाणून घ्या काय आहे ऑफर

Jio Recharge Plan: आपल्या ग्राहकांना खूश करण्यासाठी जिओ नवनवीन ऑफर्स आणत असते. सध्या आयपीएल सुरू असल्याने अनेकजण मॅच बघण्यासाठी वेगवेगळे रिचार्ज प्लॅनच्या शोधात आहेत.

Satish Daud

Jio Unlimited Calling Pack: देशात सर्वात आधी आणि सर्वात जास्त 5G चं जाळं पसरवणारी नेटवर्क कंपनी म्हणजे रिलायन्स जिओ. सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन ऑफर करण्यासाठी रिलायन्स जिओ प्रसिद्ध आहे. ग्राहकांना अधिक आकर्षित करण्यासाठी जिओकडुन सतत नवीन प्लॅन लाँच केले जातात. शहरासह ग्रामीण भागातही जिओचे ग्राहक आहेत. (Latest Marathi News)

आपल्या ग्राहकांना खूश करण्यासाठी जिओ नवनवीन ऑफर्स आणत असते. सध्या आयपीएल सुरू असल्याने अनेकजण मॅच बघण्यासाठी वेगवेगळे रिचार्ज प्लॅन शोधत आहेत. अशातच जिओने आपल्या ग्राहकांना खूश करण्यासाठी सर्वात स्वस्त आणि मस्त प्रीपेड प्लॅन बाजारात आणला आहे. चला तर मग जाणून घेऊया, जिओच्या नवीन प्रीपेड प्लॅनबद्दल

जिओच्या या प्लॅनमध्ये, तुम्हाला चांगली व्हॅलेडिटी तर मिळणारच आहे. त्याचबरोबर इतर अनेक फायदे देखील यामध्ये दिले जातील. या प्लॅनमध्ये यूजरला डेली डेटासह, व्हॉइस कॉलिंग आणि एसएमएसची सुविधा मिळणार आहे. यासोबतच जिओच्या काही अॅप्सचा अॅक्सेसही मिळणार आहे.

जिओचा ७१९ रुपयांचा प्रीपेड प्लॅन

जिओच्या नवीन प्रीपेड प्लॅनची किंत ७१९ रुपये इतकी आहे. यामध्ये ८४ दिवसांची वैधता युजर्सना देण्यात आली आहे. या प्लॅनचा वापर करून जिओ ग्राहक त्यांच्या सर्व गरजा पूर्ण करू शकतात. या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना दररोज 2 GB डेटा वापरण्याची सुविधा दिली जाते म्हणजेच एकूण 168 GB डेटा दिला जातो.

वापरकर्ते अमर्यादित 5G डेटा वापरू शकतात. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देखील दिली जाईल जी ८४ दिवसांसाठी वैध असेल. तसंच यासोबतच यूजर्सना दररोज १०० एसएमएस वापरण्याची सुविधाही दिली जाणार आहे. याशिवाय या प्लॅनमध्ये जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ सिक्युरिटी अशा काही सुविधा मिळतात. त्यामुळे या सर्व गोष्टींकडे पाहता हा प्लान तुमच्यासाठी अगदी बेस्ट ठरू शकतो.

कारण यामध्ये तुम्हाला सुमारे तीन महिन्यांची वैधता मिळते, ज्यामुळे तुम्हाला सतत रिचार्ज करावा लागणार नाही आणि तुम्ही तीन महिन्यांचा रिचार्ज एकत्रच करु शकता. तसंच कॉलिंगकचं टेन्शन नाही. इंटरनेटही भरपूर मिळत आहेत. आता हे सगळं जाणून घेतल्यावर जर तुम्हाला या रिचार्जचा फायदा घ्यायचा असेल, तर तुम्ही Jio च्या वेबसाइटवरून हा रिचार्ज करु शकता.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pitru Paksha 2025: पितृपक्षात कपडे विकत घेणे का टाळावे? जाणून घ्या नेमकं कारण

Nepal Protest: नेपाळमध्ये सोशल मीडिया बंदीविरोधात आंदोलन पेटलं; १८ मृत्यू, २५० पेक्षा जास्त जखमी|VIDEO

Maharashtra Politics : आमची लोक वाघाची शिकार करायची, आता...; राष्ट्रवादीच्या आमदाराचं वादग्रस्त विधान

Vice President Election: उपराष्ट्रपती निवडणुकीआधी मोठी घडामोड; 'या' दोन पक्षांचा मतदानास नकार, काय आहे कारण?

Maharashtra Live News Update: हिंजवडीतील खराब रस्त्याविषयी सुप्रिया सुळे यांची परत एकदा एक्स वर पोस्ट करत प्रशासनाची कानउघडणी

SCROLL FOR NEXT