RBI Governor Shaktikanta Das On Inflation and Interest Rate  Saam Tv
देश विदेश

RBI on Inflation : वाढत्या महागाईवर RBI गव्हर्नर यांचे स्पष्ट मत; व्याजदर वाढ रोखणे आमच्या हातात नाही!

RBI Governor Shaktikanta Das on Inflation : वाढत्या महागाईवर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी स्पष्ट मत व्यक्त केले आहे.

Nandkumar Joshi

RBI Governor Shaktikanta Das on Inflation : वाढत्या महागाईवर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी स्पष्ट मत व्यक्त केले आहे. वाढते व्याजदर रोखणे आरबीआयच्या हातात नाही, असे दास म्हणाले.

आरबीआय गव्हर्नर (RBI Governor) शक्तिकांत दास (Shaktikanta Das) म्हणाले की, 'आगामी दिवसांत व्याजदार कपातीचा निर्णय अर्थव्यवस्थेची त्या- त्या वेळची परिस्थिती आणि आकडेवारीवर अवलंबून असेल.' (Latest Marathi News)

मे महिन्यात किरकोळ महागाई दर एप्रिलच्या तुलनेत कमी होतील असा अंदाज आहे. एप्रिलमध्ये किरकोळ महागाई दर १८ महिन्यांचा निचांकी स्तर ४.७० टक्क्यांवर आला. तर त्याच्या बरोबर एका वर्षापूर्वी एप्रिल २०२२ मध्ये किरकोळ महागाई दर ७.७९ टक्क्यांवर पोहोचला होता, असेही शक्तिकांत दास म्हणाले.

सीआयआयच्या वार्षिक सभेला संबोधित करताना शक्तिकांत दास यांनी वाढत्या व्याजदरांवरही मत व्यक्त केले. वाढते व्याजदर रोखणे आरबीआयच्या हातात नाही. त्या- त्या वेळच्या परिस्थितीवर ते अवलंबून असेल.

महागाई दर नक्कीच कमी झाले आहेत. पण ही वेळ निष्काळजीपणा करण्याची नाही. आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी जीडीपी ७ टक्क्यांहून अधिक असू शकतो असे संकेत आकडेवारीवरून मिळतात, असेही दास म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुसळधार पावसामुळे धुळे शहरातून वाहणारी पांझरा नदीला आला पूर

Donut Recipe: लहान मुलांसाठी घरच्या घरी बनवा एगलेस टेस्टी चॉकलेट डोनट्स; वाचा सोपी रेसिपी

भाजप नेत्याच्या हत्या प्रकरणी काँग्रेसच्या दिग्गज नेत्याला जमीन मंजूर

Rain Alert: पुढील २४ तास मुसळधार पावसाचे, पुणे- नाशिकसह ४ जिल्ह्यांना रेड अलर्ट

Late Night Cravings: रात्री अचानक तुम्हालाही लागते का भूक? या गंभीर आजारांचं लक्षण असू शकतं

SCROLL FOR NEXT