Ratan Tata Viral Tweet Saamtv
देश विदेश

Ratan Tata Viral Tweet: माणूसकीचं आवाहन! द ग्रेट रतन टाटांच्या एका ट्वीटने ह्रदय जिंकलं; वाचून तुम्हीही व्हाल भावुक

Ratan Tata Viral News: रतन टाटा यांच्या या माणूसकीच्या सल्ल्याचे सर्वत्र कौतुक होत असून नेटकऱ्यांनीही त्यावर भरभरुन प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Gangappa Pujari

Ratan Tata News: फक्त भारतातच नव्हेतर संपूर्ण जगभरात उद्योग जगतातील सन्माननीय व्यक्तिमत्व म्हणून रतन टाटा यांचे नाव घेतले जाते. रतन टाटा भारतातील एक यशस्वी उद्योजक म्हणून ओळखले जातात. ते टाटा उद्योग समूहाचे (Tata Group) सर्वेसर्वा आहेत. मिठापासून ते आलिशान गाड्यांपर्यंत प्रत्येक वस्तूची निर्मिती टाटा उद्योगांमधून केली जाते.

रतन टाटा (Ratan Tata) सोशल मीडियापासून लांब राहत असले तरी त्यांचा जगभरात मोठा चाहता वर्ग आहे. ते सोशल मीडियावरुन नेहमी वेगवेगळ्या विषयांवर अपडेट देत असतात. सध्या त्यांच्या एका ट्वीटने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले असून सध्या ते सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी पावसाळ्यात गाडी चालवताना महत्वाचे सल्ले देवून पुन्हा एकदा माणूसकीचे दर्शन घडवले आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

याबाबत अधिक माहिती अशी की, सध्या पावसाळ्याचे (Rain) दिवस सुरू झालेत. या दिवसात अनेकजण गाडीने प्रवास करताना घाई गडबडीत गाडी चेक न करता तसेच प्रवासाला सुरूवात करतात. अशावेळी गाडीच्या आसऱ्याला थांबलेल्या एखाद्या मुक्या जीवाला इजा होऊ शकते . याच विषयावर रतन टाटा यांनी सर्वांनाच एक माणूसकीचा संदेश दिला आहे. ज्यामध्ये त्यांनीगाडी सुरू करताना इंजिन तपासून घेण्याचा मोलाचा सल्ला दिला आहे.

काय आहे ट्वीट..

"आता पावसाळा सुरू झाला आहे, खूप भटकी मांजरं आणि कुत्री आमच्या गाड्यांखाली आसरा घेतात. आश्रय घेत असलेल्या भटक्या प्राण्यांना इजा होऊ नये म्हणून ती चालू करण्यापूर्वी आणि वेग वाढवण्यापूर्वी आमच्या कारखाली तपासणे महत्वाचे आहे. आपल्या वाहनांखाली त्यांच्या उपस्थितीबद्दल आम्हाला माहिती नसल्यास ते गंभीर जखमी होवू शकतात किंवा मारले जाऊ शकतात. या ऋतूमध्ये जेव्हा आपण सर्वांनी त्यांना तात्पुरता निवारा देऊ शकलो तर ते मानवतेचे ठरेल."

नेटकऱ्यांकडून कौतुक...

दरम्यान, रतन टाटा यांचे हे ट्वीट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. रतन टाटा यांच्या या माणूसकीच्या सल्ल्याचे सर्वत्र कौतुक होत असून नेटकऱ्यांनीही त्यावर भरभरुन प्रतिक्रिया दिल्या आहेत. दिल्लीमध्ये ताजमहाल पाहायला गेलेल्या पर्यटकाच्या गाडीत गुदमरुन एका कुत्र्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे रतन टाटा यांनी हा सल्ला दिल्याचे सांगण्यात येत आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

चतुरस्र अभिनेता-दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; चित्रपटसृष्टीवर शोककळा, ५ दशकांत ६०० हून अधिक चित्रपटांत केलं होतं काम

Maharashtra News Live Update: Mumbai: रायगडच्या खालापुरमध्ये लागल्या वाहनांच्या रांगा

रायगडमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का; सुनील तटकरेंच्या समर्थकांचा शिवसेनेत प्रवेश

तटकरे जन्माला आले तेव्हाच...; शिंदेसेनेच्या आमदाराची जीभ घसरली, काय म्हणाले? पाहा व्हिडिओ

Natural Plants : घरात डास, माश्या आणि मुंग्यांचा त्रास होतोय? लावा ही ५ रोपे आणि कीटकांना ठेवा दूर

SCROLL FOR NEXT