Ratan Tata Latest News:  Saamtv
देश विदेश

Ratan Tata News: किती ती मनाची श्रीमंती! लाडक्या श्वानासाठी रतन टाटांनी राजघराण्याचं आमंंत्रण धुडकावलं; वाचा हृदयस्पर्शी किस्सा

Ratan Tata Latest News: देशाने एक प्रेमळ, सच्चा देशभक्त, प्राणीमात्रांवर दया करणारा मनाने श्रीमंत उद्योजक गमावला, अशीच भावना प्रत्येकजण व्यक्त करत आहे. रतन टाटा हे श्वानप्रेमी होते, त्यांच्या या प्राणी प्रेमाचे असंख्य किस्सेही सांगितले जातात.

Gangappa Pujari

Ratan Tata Death News: ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचे बुधवारी निधन झाले. मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रतन टाटा निधनाने जगभरात हळहळ व्यक्त होत आहे. देशाने एक प्रेमळ, सच्चा देशभक्त, प्राणीमात्रांवर दया करणारा मनाने श्रीमंत उद्योजक गमावला, अशीच भावना प्रत्येकजण व्यक्त करत आहे. रतन टाटा हे श्वानप्रेमी होते, त्यांच्या या प्राणी प्रेमाचे असंख्य किस्सेही सांगितले जातात. असाच एक गाजलेला किस्सा म्हणजे आपल्या कुत्र्याच्या आजारपणामुळे रतन टाटा यांनी थेट इंग्लडच्या शाही परिवाराचे निमंत्रण नाकारले होते.

२०१८ मध्ये रतन टाटा यांना त्यांच्या सेवाभावी कार्यासाठी इंग्लडचा राजा प्रिन्स चार्ल्सने सन्मानित करण्याचा निर्णय घेतला होता. ब्रिटीश एशियन ट्रस्टच्या विद्यमाने त्यांना 'जीवनगौरव पुरस्कार' देण्याची योजना आखण्यात आली होती. 6 फेब्रुवारी 2018 साठी बकिंगहॅम पॅलेसमध्ये सर्व तयारी करण्यात आली होती. रतन टाटा यांना या कार्यक्रमाची आधीच माहिती देण्यात आली होती. वैयक्तिकरित्या पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला होता.

मात्र, रतन टाटा यांनी शेवटच्या क्षणी इंग्लंडला जाण्याचा बेत रद्द केला. प्रवासापूर्वीच त्याचा पाळीव कुत्रा आजारी पडला. ब्रिटीश राजघराण्याने सन्मानित करण्याचा हा महत्त्वपूर्ण प्रसंग त्यांच्या प्रिय पाळीव प्राण्यापेक्षा महत्वाचा वाटला नाही. उद्योगपती, स्तंभलेखक आणि अभिनेते सुहेल सेठ यांनी हा प्रसंग सांगितला होता.

रतन टाटा यांच्या दोन कुत्र्यांपैकी एकाची, टँगो आणि टिटोची तब्येत बिघडली होती. तेव्हा टाटा म्हणाले होते की मी त्याला सोडू शकत नाही. रतन टाटा यांनी या कार्यक्रमाला न जाण्याचे कारण सुहेल सेठ यांना फोनवरून सांगण्यात आले. त्या पुरस्कार कार्यक्रमासाठी सेठ लंडनमध्ये होते. पण सर्वात महत्वाचे म्हणजे या कार्यक्रमात रतन टाटा न येण्याचे कारण प्रिन्स चार्ल्स यांना समजले तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. हीच माणूसकी आहे, हा रतन आहे. यामुळेच टाटा हाऊस आज ज्या स्थितीत आहे त्या स्थितीत आहे, असे इंग्लडच्या प्रिन्सने त्यावेळी म्हटले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking Video: बापरे बाप... चक्क काकूंनी सापांना कपड्यांसारखे धु धु धुतले; व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही म्हणाल...

Vastu Tips: वास्तुनुसार 'या' मूर्ती घरात ठेवा, सुख शांती मिळेल

Maharashtra News Live Updates: योगींच्या 'बटेंगे तो कटेंगे' घोषणेला देवेंद्र फडणवीस यांचं समर्थन

Winter Drinks: हिवाळ्यात हे आरोग्यदायी पेय प्या आणि शरीराला ठेवा उबदार

असंख्य घरांमध्ये लपलीये एक मांजर; तुम्ही १० सेकंदात शोधून दाखवाच!

SCROLL FOR NEXT