Shocking News X
देश विदेश

Shocking : आधी मुलाशी ठरवलं लग्न, मग होणाऱ्या सुनेला घेऊन पळून गेला; जेव्हा परतला तेव्हा भयकंर घडलं...

Shocking News : रामपूरमधील एकजण त्याच्या होणाऱ्या सुनेच्या प्रेमात पडला. घरातील पैसे आणि दागिने घेऊन त्याने भावी सुनेसह पळून जाऊन लग्न केले. लग्न करुन आल्यानंतर त्याचा मुलाशी वाद झाला.

Yash Shirke

एका व्यक्तीने होणाऱ्या सूनेसह पळून जाऊन लग्न केले आहे. सहा अपत्य असलेल्या या व्यक्तीने त्याच्या अल्पवयीन मुलाचे जबरदस्तीने लग्न ठरवले होते. ज्या मुलीशी त्याने मुलाचे लग्न ठरवले होते, त्याच मुलीशी पळून जाऊन लग्न केल्याचा व्यक्तीवर होत आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर गावात खळबळ उडाली आहे. ही घटना उत्तरप्रदेशातील रामपूर येथे घडली आहे.

मिळलेल्या माहितीनुसार, भावी सुनेसह पळून जाऊन लग्न करणाऱ्या व्यक्तीचे नाव शकील असे आहे. शकील रामपूर जिल्ह्यातील बनसानाली गावात राहतो. त्याला सहा मुलं आहेत. शकीलने त्याच्या अल्पवयीन मुलाचे लग्न खेमपूर गावातील एका मुलीशी ठरवले. कुटुंबीयांनी या निर्णयावर आक्षेप घेतले. यावरुन शकीलने त्याची पत्नी आणि मुलांना मारहाण केली. पण मुलाच्या लग्नाआधीच शकील त्याच्या होणाऱ्या सुनेसह पळून गेला.

शकीलच्या पत्नीने या प्रकारावर प्रतिक्रिया दिली. मुलाचे लग्न ठरवल्यानंतर शकील त्याच्या भावी सुनेशी फोनवर गप्पा मारायचा. व्हिडीओ कॉलवर देखील त्यांचा संवाद सुरु होता. कुटुंबातील सदस्यांनी याला विरोध केला, तेव्हा शकीलने त्यांना मारहाण केली. शकील आणि भावी सुनेला मी अनेकदा संशयास्पद स्थिती पाहिले होते. त्यांच्या नात्याला मी आणि माझ्या मुलाने विरोध केला, असे शकीलच्या पत्नीने म्हटले.

शकील आणि 'त्या' मुलीमध्ये सतत व्हिडीओ कॉल व्हायचे. एके दिवशी तो घरात ठेवलेले २ लाख रोख रुपये आणि दीड तोळा सोने घेऊन पळून गेला. त्याने पळून जाऊन त्या मुलीशी लग्न केले. मुलीच्या कुटुंबियांनी या लग्नावर आक्षेप घेतला नाही. मला आणि माझ्या मुलांना न्याय हवा आहे, असे म्हणत शकीलच्या पत्नीने दु:ख व्यक्त केले. या प्रकरणी पोलिसांनी शकीलच्या विरोधात गुन्हा दाखल केल्याचे म्हटले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: शिंदेंच्या शिवसेनेच्या नाशिकमधील बैठकीत राडा

Ambarnath Palika : एक महिन्यात समस्या सोडवा, अन्यथा पालिकेला टाळं ठोकू; पालिकेवर धडक देत भाजपचा इशारा

बारामतीत देशभक्ती उजळून निघणार, ३० मीटर उंच राष्ट्रध्वजाचे भव्य लोकार्पण|VIDEO

Peanut Chocolate Recipe : फक्त ३ साहित्य वापरून बनवा कुरकुरीत आणि गोडसर शेंगदाणा चॉकलेट

Maharashtra Tourism: छत्रपती संभाजीनगरमध्ये वसलाय स्वर्ग,'ही' सुंदर ठिकाणं पाहिलीत का?

SCROLL FOR NEXT