Ram Mandir Attack Plot Probe saam tv
देश विदेश

Ram Mandir Attack Plot Probe: अयोध्येतील राम मंदिरावर दहशतवादी हल्ल्याचा कट; संशयिताला अटक, हँड ग्रेनेड जप्त

Ram Mandir Attack Plot Probe: केंद्रीय यंत्रणेच्या माहितीनंतर गुजरात एटीएस आणि फरीदाबाद एसटीएफच्या पथकाने संयुक्त कारवाई करत संशयिताला अटक केलीय.

Bharat Jadhav

अयोध्येतील राम मंदिरावर हल्ला करण्याचा एक मोठा दहशतवादी कट रचणाऱ्या संशयित आरोपीला अटक करण्यात आलीय.गुजरातमधील दहशतवादी विरोधी पथक आणि फरीदाबाद स्पेशल टास्क फोर्स ही अटकेची कारवाई केलीय. या दोन्ही पथकाच्या संयुक्त कारवाईत उत्तर प्रदेशातील रहिवासी अब्दुल रहमान (१९) या संशयिताला अटक करण्यात आलीय. त्याच्या माहितीनंतर फरीदाबाद येथून दोन हँड ग्रेनेड जप्त करण्यात आले आहेत. फरीदाबादमधील सुरक्षा यंत्रणांनी सदर बॉम्ब निकामी केले आहेत.

एपीबी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, फरीदाबाद येथील हँडलरकडून बॉम्ब घेतल्यानंतर रेहमान पुन्हा अयोध्येत येणार होता. मात्र त्या आधीच त्याला अटक करण्यात आली. केंद्रीय यंत्रणेच्या माहितीनंतर गुजरात एटीएस आणि फरीदाबाद एसटीएफच्या पथकाने संयुक्त कारवाई केली. चौकशीदरम्यान रेहमानने फरीदाबाद येथे शस्त्रास्र लपवून ठेवण्यात आल्याचे सांगितले. या माहितीनंतर पोलिसांनी पाली परिसरातील पडक्या घराची झडती घेतली, तिथे चार तासांच्या शोधानंतर दोन हँड ग्रेनेड आढळून आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP आंदोलन करणार की थांबवणार, कोर्टाच्या बंधनानंतर दीपके काय करणार?

Monday Horoscope : 5 राशींना मिळणार खुशखबर! देवीच्या दर्शनाने दिवस शांततेत जाईल; वाचा सोमवारचे राशीभविष्य

Ratnagiri: काळीज पिळवटून टाकणारी घटना! खाडीत बुडून एकाच कुटुंबातील ४ मुलांचा मृत्यू

पुणे शिक्षक-पदवीधर निवडणुकीसाठी भाजपचा मास्टर प्लॅन; रवींद्र चव्हाण मैदानात!

YouTuber Dhruv Rathee: यूट्युबर ध्रुव राठींची 20 तासांनंतर सुटका; राठींचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT