Viral Video : राजस्थानमध्ये महिलेच्या अंगावर JCB चढवून ठार मारण्याचा प्रयत्न!  SaamTvNews
देश विदेश

Viral Video : राजस्थानमध्ये महिलेच्या अंगावर JCB चढवून ठार मारण्याचा प्रयत्न!

या व्हिडीओमध्ये दिसत आहे कि एका इसमाने महिलेला जमिनीवर दाबून धरले आहे आणि जेसीबी चालक तिच्या अंगावर JCB मशीन चढवण्याचा प्रयत्न करत आहे.

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यातून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. एका महिलेला दिवसाढवळ्या JCB मशीन अंगावर घालून मारण्याचा प्रयत्न होत असल्याचा हा व्हिडीओ पाहून अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये महिलेला जबरदस्त मारहाण केली जात आहे व तिच्यावर जेसीबी मशिन चढवण्याचाही प्रयत्न केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडीओ राजस्थानच्या बायतू पोलीस स्टेशन परिसरातील आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एकटी असूनही महिला स्वत:ला वाचवण्यासाठी दगड उचलत आहे. मात्र, हि एकटी महिला जीव वाचवण्यासाठी कितपत धडपड करू शकणार? या व्हिडीओमध्ये दिसत आहे कि एका इसमाने महिलेला जमिनीवर दाबून धरले आहे आणि जेसीबी चालक तिच्या अंगावर JCB मशीन चढवण्याचा प्रयत्न करत आहे.

जमिनीच्या वादातून घडलाय हा धक्कादायक प्रकार :

या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात जमिनीच्या ताब्यावरून झाल्याचे आसपासच्या लोकांनी सांगितले. जमिनीच्या वादातून काही महिला व पुरुषांनी या एकट्या महिलेवर हल्ला चढवला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. एकीकडे नि:शस्त्र महिलेसोबत अश्या पद्धतीने अत्याचार होत आहे याबबाबत नेटकऱ्यांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. महिलेवर अत्याचार करणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी देखील करण्यात येतेय.

13 नोव्हेंबरला घडला हा थरार :

बाडमेरचे पोलीस अधीक्षक दीपक राघव यांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती देताना सांगितले की, 13 नोव्हेंबर रोजी जमिनीवरून दोन्ही बाजूंमध्ये हाणामारी झाली होती. या घटनेनंतर नजीकच्या पोलीस ठाण्यात परस्पर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यात विसर्जनासाठी गेलेले ४ जणांचा पाण्यात बुडून मृत्यू

Ganesh visarjan 2025 : गणपतीचे विसर्जन करताना विपरीत घडलं, तीन तरुण पाण्यात वाहून गेले

Pune News: पुण्यात दगडूशेठ गणपतीची महाआरती पाहा VIDEO

ITR Filing : टॅक्स रिफंड परताव्याचा फॉर्म अडकून पडलाय? मग 'या' गोष्टी एकदा तपासाच

Akola Accident: गणेश विसर्जन करून परताना भक्तांवर काळाचा घाला; तरुणाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT