Madhya Pradesh buffalo Kala Badal steals spotlight in Pushkar Mela  saam tv
देश विदेश

पुष्कर मेळ्यात मध्य प्रदेशच्या ‘काळा बादल’ची चर्चा; अवघ्या २० महिन्यांत वजन ७६० किलो

viral buffalo Pushkar : राजस्थानमधील प्रसिद्ध पुष्कर पशुमेळ्यात सध्या मध्य प्रदेशातील 'काळा बादल' नावाचा महाकाय रेडा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे.

Saam TV News

राजस्थानमधील प्रसिद्ध पुष्कर पशुमेळ्यात मध्य प्रदेशातून आलेला ‘काळा बादल’ नावाचा भव्य भैसा सध्या आकर्षणाचे केंद्र ठरला आहे. अवघ्या २० महिन्यांच्या या भैशाचे वजन तब्बल ७६० किलो असल्याचा दावा त्याचे मालक शैलेंद्र चौधरी यांनी केला आहे. त्याची भव्य शरीरयष्टी पाहण्यासाठी मेळ्यात नागरिकांची मोठी गर्दी होत आहे.

पुष्कर मेळ्यात दरवर्षी देशाच्या विविध भागांतून पशुपालक आपली देखणी आणि वैशिष्ट्यपूर्ण जनावरे घेऊन येतात. यंदा मध्य प्रदेशातून आलेल्या ‘काळा बादल’ने आपल्या असामान्य वजनामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याची शरीरयष्टी, रुबाबदार व्यक्तिमत्त्व आणि कमी वयात झालेले वजन पाहून अनेकजण आश्चर्य व्यक्त करत आहेत.

नावामागेही आहे खास कारण

भैशाचे मालक शैलेंद्र चौधरी यांनी सांगितले की, ‘काळा बादल’चा रंग अतिशय गडद काळा असून त्यात सोनेरी छटाही दिसून येतात. त्याचा स्वभावही शांत आणि समजूतदार आहे. याच वैशिष्ट्यांमुळे त्याचे नाव ‘काळा बादल’ ठेवण्यात आले.

आईची दूध देण्याची क्षमता २५ लिटर

‘काळा बादल’च्या कुटुंबाची दूध उत्पादनाची क्षमताही विशेष आहे. मालकांच्या माहितीनुसार, त्याच्या आईची दोन्ही वेळची मिळून दररोज सुमारे २५ लिटर दूध देण्याची क्षमता होती. त्यामुळे त्याच्या वंशावळीकडेही पशुपालकांचे लक्ष वेधले जात आहे. विशेष म्हणजे, तब्बल ७६० किलो वजन असूनही ‘काळा बादल’च्या आहारात कोणताही विशेष किंवा महागडा खुराक नाही. त्याला नेहमीप्रमाणे हिरवा चारा, गवत आणि सामान्य पशुखाद्य दिले जाते, असे चौधरी यांनी सांगितले.

मेळ्यात पाहण्यासाठी गर्दी

‘काळा बादल’ला पाहण्यासाठी पुष्कर मेळ्यात पशुप्रेमी आणि पर्यटकांची गर्दी होत आहे. त्याचे कमी वय, प्रचंड वजन आणि आकर्षक शरीरयष्टी यामुळे तो यंदाच्या मेळ्यातील चर्चेचा विषय बनला आहे. देशभरातील वैशिष्ट्यपूर्ण पशुधनाचे प्रदर्शन करणाऱ्या पुष्कर मेळ्यात ‘काळा बादल’ने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Mega Block: रविवारी बाहेर पडण्याआधी रेल्वेचं वेळापत्रक बघा! 'या' मार्गांवर लोकलच्या फेऱ्या रद्द

Maharashtra News Live Update: सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनी बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांची भेट घेतली

लोकसभेच्या तयारीसाठी काँग्रेसचा मास्टर प्लॅन! पुण्यात बड्या नेत्यांची खलबतं,राहुल गांधींकडे जाणार महाराष्ट्राचा रिपोर्ट

ठाकरे सेनेच्या नगरसेवकाकडून महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्तांना मारहाण

राज्यातील सैनिकी शाळांचं ऑडिट होणार! फडणवीसांचा मोठा निर्णय; अनेक शाळांवर कारवाईची टांगती तलवार

SCROLL FOR NEXT