Defence Minister Rajnath Singh hints at India’s strategy for PoK; Pakistan on edge. saam tv
देश विदेश

भारत पीओके ताब्यात घेणार? राजनाथ सिंहांनी पाकिस्तानची झोप उडवली

Rajnath Singh Warns Pakistan: संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांनी पाकिस्तानची झोप उडवलीय. कारण ऑपरेशन सिंदूरनंतर भारतानं मिशन पीओकेवर लक्ष केंद्रीत केलंय..मात्र भारत पीओके कसं ताब्यात घेणार आहे. त्याची रणनीती नेमकी कशी आहे? पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.

Snehil Shivaji

  • राजनाथ सिंह यांनी भारताचं लक्ष पीओकेवर असल्याचं संकेत दिले.

  • पाकिस्तानमध्ये यामुळे प्रचंड अस्वस्थता आणि सतर्कता वाढली आहे.

  • ऑपरेशन सिंदूरनंतर भारताचं पुढचं लक्ष्य पीओके असू शकतं.

सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक आणि ऑपरेशन सिंदूर राबवून भारतानं पाकव्याप्त कश्मिरमधील दहशतवाद आणि दहशतवादी संपवून टाकले. आता वेळ जवळ आलीये. ती पीओकेवर ताबा घेण्याची. होय. उद्या किंवा परवा किंवा येणारी एक सकाळ ही पीओकेला भारतात घेऊन भारत एकसंध होण्याची वेळ आलीये. त्याला कारण ठरलंय. ते भारताच्या संरक्षण मंत्र्यांचं एक विधान. पाहा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह काय म्हणाले.

ऐकलंत राजनाथ सिंह यांनी काय म्हटलंय. देशाच्या संरक्षण मंत्र्यांच्या या एका विधानानं पाकिस्तानच्या सत्ताधाऱ्यांची झोप उडालीये. कारण गेल्या अनेक वर्षांपासून पीओकेमधील या सुंदर पर्वतीय प्रदेशात दहशतवाद्यांची फॅक्टरी उघडून जगाला अस्थिर करण्याचं त्यांचे स्वप्न आता भंगणारेय. खरंतर भारताच्या या भूभागावर पाकचं नियंत्रण आहे परंतू येथील पाच साडे पाच लाख लोकं मात्र दहशतवादानं भरडले आणि महागाईनं पिचलेत. रोजचं जीवन जगण्यासाठी त्यांना भारतापेक्षा दुप्पट दर देऊन जीवन जगावं लागतंय. पीओकेमध्ये रोज लागणाऱ्या वस्तूंच्या दरावर एक नजर टाकूया.

वस्तू भारत पीओके

कांदा 30-40 रुपये 50-60 रुपये

दूध 60-70 रुपये 120-140 रुपये

साखर 40-50 रुपये 70-80 रुपये

तेल 100-120 रुपये 180-200 रुपये

चिकन 200-300 रुपये 500-600 रुपये

हे दर पाहून आणि भयाण वातावरणातून मुक्त होत, स्वाभिमानानं स्वतंत्र्यात जगणं हे भागातील नागरिकांना देखिल परवडणारंच. त्यामुळे आता भारतानं जर आपली शक्ती आणि युक्ती वापरून जर पीओकेवर ताबा मिळवला तर नवल वाटालया नको म्हणूनच आता तयारी सुरु झाली ती गेल्या 75 वर्षांपासून जुलूमशाहीत भरडलेल्या प्रदेशाला मुक्त करण्याची. आणि पीओकेत तिरंगा फडकवण्याची.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: संघटीत गुन्हा निष्पन्न, बागूल टोळीवर मोक्का लावण्याच्या हालचाली सुरू

8th Pay Commission: आठवा वेतन आयोग कधी लागू होणार? पगार कितीने वाढणार? समोर आली मोठी अपडेट

BJP MLA Death: भाजपचे आमदार शिवाजी कर्डीले यांचे निधन, ६७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Jio Home Offer: Jio ची जबरदस्त ऑफर! ६० दिवस मोफत इंटरनेट, १००० टीव्ही चॅनेल आणि OTT अ‍ॅप्स फ्री

Manmad : नगर- मनमाड महामार्गावर अग्नितांडव, हार्वेस्टर वाहनाला भीषण आग |VIDEO

SCROLL FOR NEXT