accident saam tv
देश विदेश

Rajasthan : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी विचित्र अपघात; तीन वाहनांची एकमेकांना धडक, दुर्घटनेत ९ जण ठार

राजस्थानमध्ये नववर्षाच्या पहिल्याच दिवशी वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे

Vishal Gangurde

Rajasthan News : राजस्थानमध्ये नववर्षाच्या पहिल्याच दिवशी वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे. राजस्थानच्या सीकरमध्ये रविवारी सांयकाळी ४ वाजता तीन वाहनांचा अपघात झाला आहे. या अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला आहे. (Latest Marathi News)

राजस्थानमधील खंडेला-पलसाना मार्गावर तीन वाहने एकमेकांना धडकल्याने विचित्र अपघात झाला आहे. या अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ६ जण जखमी झाले आहेत. तर तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघात झाल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिकअप आणि दुचाकीमध्ये अपघात झाला. याच वेळी या दोन्ही वाहनांना ट्रकने धडक दिली. या भीषण अपघातात ९ जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतामध्ये एक दुचाकीस्वार आणि पिकअपमधील ८ जणांचा सामावेश आहे. पिकअपमध्ये राहणारे सर्व सामोद येथील राहणारे होते. तर दुचाकीस्वार हा खंडेला येथील सुंदरपुरा येथे राहणारा होता.

जखमींमध्ये दुचाकीस्वाराची पत्नी आणि त्यांचा दोन मुलांचा सामावेश आहे. पिकअपमधील राहणारे २० लोक खंडेला येथे राहणारे आहे. पिकअपमधील प्रवासी हे गणेश धाम मंदिरातून दर्शन घेऊन परतत होते. त्यावेळीच ही दुर्घटना घडली. या अपघातानंतर खासदार सुमेधानंद सरस्वती आणि माजी केंद्रीय मंत्री सुभाष महरिया हे जखमींना भेटण्यासाठी सीकर येथे पोहोचले आहेत.

भयंकर! कारने उडवल्यानंतर तरुणीला तब्बल 4 किमी फरफटत नेले

देशभरात नववर्षाचा जल्लोश साजरा केला जात असतानाच राजधानी दिल्लीमध्ये एका भयंकर अपघाताची बातमी समोर आली आहे. दिल्लीमध्ये पाच कारमधून प्रवास करणाऱ्या मुलांनी स्कूटीला धडक देत गाडीवरील मुलीला तब्बल 4 किलोमीटर फरफटत नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामधील मुलीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी रात्री ३ वाजता घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SRH vs DC: अभिषेक शर्माच्या शतकाच्या मदतीनं हैदराबादने दिल्लीला दिली मात,SRHच्या विजयानंतर Points Table मध्ये मोठी उलथापालथ

Shocking : दुसऱ्या जातीची सून नको! संतापलेल्या चुलत्याचा पुतण्यावर जीवघेणा हल्ला

तरुणीला लॉजवर बोलवलं, अश्लील मेसेज पाठवले; जावेदला मुलीनं दाखवला हिसका, कल्याणमध्ये नेमकं झालं काय?

बारामती पोटनिवडणुकीत पवार कुटुंब एकत्र, सुनेत्रा पवारांच्या सांगता सभेला सुळेंची हजेरी

भाऊ-भाऊ म्हणतात आणि पाय खेचतात, नितीन गडकरींचा निशाणा कोणावर?|Video Viral

SCROLL FOR NEXT